Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Gulveer Singh, Asian Games, Three Individual Medals. गुलवीरने एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन वैयक्तिक पदके जिंकून इतिहास घडविला. पी. टी. उषानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला.
Gulveer Singh creates history with three individual medals at the Asian Games.

Gulveer Singh creates history with three individual medals at the Asian Games.

esakal

Updated on: 

नागोया, : आशियाई क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्सच्या शेवटच्या दिवशी भारतीय ॲथलिट्‍सनी एक सुवर्णपदकासह पाच पदकांची कमाई केली. भारतीय महिला ४-४०० रिले संघाने सुवर्णपदक जिंकून अखेर भारताच्या खात्यात एकूण सहावे आणि ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्ण जमा केले. गत स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्समध्ये सहा सुवर्णपदकांसह २९ पदकांची कमाई केली होती. या वेळी भारतीय ॲथलिट्सला एक सुवर्ण, नऊ रौप्य आणि १४ ब्राँझ अशी एकूण २४ पदकांची कमाई करता आली. यामुळे ॲथलेटिक्सच्या पदकतालिकेत भारताने सहावे स्थान मिळविले. गुलवीर सिंगने मिळविलेले तिसरे पदक शेवटच्या दिवशीचे भारतीय कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com