ऑलिंपियन गुरप्रीतला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - ऑलिंपियन गुरप्रीत सिंगने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. माजी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या विजय कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या ऋषिराज बारोटने कुमार गटात सुवर्णपदक जिंकून सर्वांना धक्का दिला. त्याने अंतिम फेरीत विजय कुमारपेक्षा जास्त गुण नोंदविले.

म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरप्रीतने प्राथमिक फेरीत 579 गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला. त्यानंतर अंतिम फेरीत आर्मी मार्क्‍समनशिप युनिटच्याच नीरज कुमारला 35-29 असे चकवले. त्यांचाच सहकारी विजय कुमार ब्रॉंझच जिंकू शकला. गुरप्रीत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सांघिक सुवर्णपदक जिंकणे अपेक्षितच होते. त्यांनी 1699 गुण मिळविताना हरियाणा (1690) आणि महाराष्ट्रास (1672) सहज मागे टाकले.

कुमार गटात ऋषिराजने पंजाबच्या आन्हादा जावांदा याला अंतिम फेरीत सहज मागे टाकले. प्राथमिक फेरीत सहावा असलेल्या ऋषिराजने 25 गुण मिळवताना अंतिम फेरीतील विजय कुमारपेक्षा जास्त गुण मिळविले. त्याने आन्हादा 17 गुणच मिळवू शकला, तर ब्रॉंझपदक विजेता शिवम शुक्‍ला 10 गुणच नोंदवू शकला. या गटात हरियाणाने सांघिक सुवर्णपदक जिंकताना पंजाब आणि उत्तराखंडपेक्षा सरस कामगिरी केली.

Web Title: Gurpreet Olympian to win a gold medal