IND vs NZ : टेस्ट संघात स्थान न मिळाल्याने खेळाडूचा BCCI ला इशारा? सूचक ट्वीट| Cricket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ : टेस्ट संघात स्थान न मिळाल्याने खेळाडूचं सूचक ट्वीट

भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारी याने केलेल्या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळालेली नाही.

IND vs NZ : टेस्ट संघात स्थान न मिळाल्याने खेळाडूचं सूचक ट्वीट

भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारी याने केलेल्या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. त्यापार्श्वभूमीवर हनुमा विहारीने केलेल्या या ट्विटमुळे उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. भारताच्या या फलंदाजाने घरेलू क्रिकेटसह भारतीय कसोटी संघातून खेळतानासुद्धा चमक दाखवली आहे. याआधी इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड झाली होती. मात्र त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नव्हती.

सध्या हनुमा विहारीला प्रियांक पांचालच्या नेतृत्वाखाली भारत ए संघात खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामने लवकरच होणार आहेत. निवड समिती हनुमा विहारीला दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यात घेण्यास तयार असल्याचंही म्हटलं जात आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा १७ डिसेंबरला होणार आहे.

हनुमा विहारीने गुरुवारी रात्री एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने काहीच लिहिलेलं नाही फक्त एक (,) स्वल्पविराम टाकून विहारीने ट्विट केलं. त्याच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय? संघात निवड न झाल्यानं व्यक्त केलेली नाराजी, की काही काळ विश्रांतीनंतर तो वेगळा निर्णय घेणार का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

हेही वाचा: Ashes मालिकेआधी टीम पेनचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ९४ सामन्यात ५५ च्या सरासरीने हनुमा विहारीने ७ हजार २६१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २१ शतके आणि ३७ अर्धशतके आहेत. तसंच त्याने त्रिशतकही झळकावलं आहे. घरेलू क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीनंतर विहारीला २०१८ मध्ये टीम इंडियात घेण्यात आलं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने पदार्पण केले. भारताकडून १२ कसोटीमध्ये त्याने ३२.८४ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या. कसोटीत त्याने एक शतक आणि चार अर्धशतके केली आहेत.हे विदर्भ दौऱ्यावर असून

loading image
go to top