काँग्रेसमध्ये जाणार का? भज्जी म्हणाला अनेक ऑफर आहेत, पण...

Harbhajan Singh
Harbhajan Singh Sakal

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) सध्या चांगलाच चर्चेत आहे. क्रिकेट इनिंग एन्डिंगची घोषणा केल्यानंतर तो राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी काही दिवस आधी भज्जीनं माजी क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तो काँग्रेसमध्ये प्रवेश कऱणार असल्याची चर्चा रंगली होती. यावर आता खुद्द भज्जीनं उत्तर दिले आहे.

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजन सिंगने काँग्रेसमधील पक्षातील प्रवेशावर आणि सिद्धू यांच्या भेटीवर भाष्य करताना म्हणाला की, सिद्धूं पाजींची घेतलेली भेट ही एक क्रिकेटर या नात्यानं घेतली. राजकीय पक्षात प्रवेशासंदर्भात या भेटीचा कोणताही अर्थ लावू नये. अनेक पक्षांकडून ऑफर येत आहेत. मात्र मी स्वत: यासंदर्भात अद्याप कोणताही विचार केलेला नाही. ज्यावेळी विचार पक्का होईल त्यावेळी कोणत्या राजकीय पक्षात जाणार याची घोषणा नक्की करेन, असे हरभजन सिंगने म्हटले आहे.

Harbhajan Singh
सिद्धूंच्या भेटीनंतर हरभजनची क्रिकेटमधून निवृत्ती; राजकीय खेळीसाठी सज्ज?

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. राजकीय मैदानात उतरण्यासाठीच त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगत आहे. याच कारण त्यानं काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सिद्धू यांनी फोटोला जे कॅप्शन दिलं होत त्यात भज्जी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत होते. पण भज्जीने आता या मुद्यावर चक्क 'दुसरा' टाकलाय .

Harbhajan Singh
'सुर्या'नं आग ओकली! 152 चेंडूत कुटल्या 249 धावा

क्रिकेटच्या मैदानात त्याने टाकलेला 'दुसरा' भल्याभल्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकायचा. अगदी तीच अवस्था त्याच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेबाबत झाली आहे. भज्जीने आपल्याला अनेक पक्षांनी ऑफर दिल्याचे सांगत नव्या इनिंगसाठी राजकीय दरवाजे खुले झाल्याचे अप्रत्यक्षरित्या कबुल केले आहे. यासंदर्भातील भूमिका थेट आणि स्पष्ट मांडणे टाळून भज्जीने या गेममध्ये नवा ट्विस्ट निर्माण केलाय. त्याची ही बोली गोलंदाजीत तो जो 'दुसरा' टाकायचा तशीच न समजणारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com