Harbhajan Singh criticism
esakal
भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने गुरुवारी कडाडून टीका केली. तो म्हणाला, की स्वत: काही साध्य न केलेल्या व क्षमता नसलेल्या व्यक्ती रोहित शर्मा व विराट कोहली (रो-को) यांसारख्या महान क्रिकेटपटूंचे भवितव्य ठरवणार आहेत. याला दुर्दैव म्हणावे लागणार आहे; मात्र रोहित शर्मा व विराट कोहली हे दोघेही २०२७मधील एकदिवसीय विश्वकरंडक खेळण्याचा विश्वास आहे. या वेळी हरभजन सिंग याने निवड समिती प्रमुख अजित आगरकर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका केली.