Hardik Pandya : सासु सासरे येती घरा तोची दिवाळी दसरा! पांड्याचा आनंद गगनात मावेना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya

Hardik Pandya : सासु सासरे येती घरा तोची दिवाळी दसरा! पांड्याचा आनंद गगनात मावेना...

Hardik Pandya : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी खिशात घातली. हार्दिक पांड्या त्यावेळेस सोशल मीडियावर दुसऱ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

हार्दिक पांड्याने आता ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासूला भेटताना दिसत आहे. हार्दिकने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, व्हिडिओ आणि फोन कॉलनंतर शेवटी भेटलो. नताशाच्या कुटुंबाला पहिल्यांदा भेटणे खूप छान वाटले.

हेही वाचा: Deepti Sharma : वॉर्निंग देऊनच 'मंकडिंग', अखेर वादावर दिप्ती बोललीच

नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते. नताशा आणि हार्दिक यांनी 2020 च्या सुरुवातीला लग्न केली. त्यानंतर नताशाने जुलै 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे.

नताशा स्टॅनकोविक ही मूळची सर्बियाची असून तिने बॉलिवूड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. नंतर त्याला खरी ओळख बॉलीवूड गायक बादशाहच्या 'डीजे वाले बाबू...' या सुपरहिट गाण्याने मिळाली. नताशाने बिग बॉस आणि नच बलिए यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.

हेही वाचा: Sandeep Lamichhane : बलात्काराचा आरोप असलेल्या लामिछानेविरूद्ध इंटरपोलची नोटिस?

हार्दिक पांड्या गेल्या टी-20 विश्वचषकानंतर खराब फॉर्म आणि फिटनेसच्या समस्येमुळे तो जवळपास 5 महिने क्रिकेटपासून दूर होता. हार्दिकने यानंतर आयपीएल 2022 मध्ये स्वतःला सिद्ध केले. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले. नंतर त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे तो भारतीय संघात परतला. हार्दिक पुनरागमन केल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.