Hardik Pandya : दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकलेला हार्दिक पांड्या IPL जवळ येताच झाला फिट, Video

Hardik Pandya marathi news
Hardik Pandya marathi newssakal

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर तो टीम इंडियातुन बाहेर गेला आणि त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळाली. हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

तंदुरुस्त नसल्यामुळे निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड केली नाही. आता हार्दिक पांड्या इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी सज्ज झाला आहे. त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे.

Hardik Pandya marathi news
Rohan Bopanna Australian Open: ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरल्यानंतर रोहन बोपन्ना झाला मालामाल, 'इतकी' मिळणार बक्षीस रक्कम

व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या म्हणाला की, 'मैदानात परतल्यानंतर मला बरे वाटत आहे. 17 वर्षांपूर्वी याच मैदानावर माझा प्रवास सुरू झाला होता. यावेळी गोलंदाजीव्यतिरिक्त हार्दिक मैदानात धावताना आणि व्यायाम करताना दिसला. तो म्हणाला, 'मी दररोज सरावासाठी जास्तीत जास्त वेळ देत आहे.'

Hardik Pandya marathi news
Video : 6,6,6,6,4,6.... एका षटकात ठोकल्या 34 धावा अन् 13 चेंडूत तुफानी अर्धशतक! द. आफ्रिकेला मिळाला नवा एबी डिव्हिलियर्स

ICC एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. टीम इंडियातून वगळल्यानंतर तो त्याच्या फिटनेसवर सतत काम करत आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पुन्हा मैदानावर गोलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आनंद झालाच असले. कारण मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. अशा परिस्थितीत त्याला संघाला 100 टक्के द्यायचे आहे.

रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्यची 15 डिसेंबर रोजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या वर्ल्ड कप सामन्यात दुखापत झाल्यापासून तो राष्ट्रीय संघाबाहेर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तो अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेला मुकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com