Hardik Pandya : पांड्या 'फ्री' हिटवर झाला हिट विकेट; पुन्हा चर्चांना उधाण मात्र नियम काय सांगतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya hit wicket free

Hardik Pandya : पांड्या 'फ्री' हिटवर झाला हिट विकेट; पुन्हा चर्चांना उधाण मात्र नियम काय सांगतो?

Hardik Pandya : टी20 विश्वचषक 2022 सुपर-12 मधील झिम्बाब्वेविरुद्ध शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतासाठी केएल राहुलनंतर सूर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक ठोकले. राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या, तर सूर्याने 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी केली. मधल्या षटकात राहुल आणि कोहली बाद झाल्यानंतर भारताच्या धावांचा वेग निश्चितच मंदावला होता, पण सूर्याने शेवटच्या 5 षटकांत भरपाई केली. भारताने शेवटच्या 30 चेंडूत 79 धावा केल्या.

हेही वाचा: Suryakumar Yadav : 'सूर्या' अभी जिंदा है! मोठ्या पडझडीनंतर भारताला सावरले

दरम्यान उत्कृष्ट अष्टपैलू हार्दिक पांड्याने 18 धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या खेळत होता त्यावेळेस अशी घटना घडली ज्यामुळे क्रिकेट चाहते गोंधळात पडले. भारताच्या डावातील 20 व्या षटकातील ही पहिली चेंडू होती, जेव्हा वेगवान गोलंदाज रिचर्डने उंच फुल टॉस टाकला ज्याला मैदानी पंचांनी नो-बॉल दिला, कारण चेंडू तो कंबरेवर होता. हार्दिक पांड्या फ्री हिट खेळण्याच्या तयारीत होता पण बाहेरचा चेंडू मारताना तो चुकला.

हेही वाचा: Suryakumar Yadav : सूर्याने इतिहास रचला! एका वर्षात हजारी मनसबदारी!

विशेष म्हणजे चेंडू खेळायला जाण्याआधीच पांड्याची बॅट स्टंपला लागली. अनेक क्रिकेट, चाहत्यांनी हिट-स्टंपनंतर हार्दिकला का आऊट केले नाही याबद्दल संभ्रम व्यक्त केला आहे. मात्र नियमनुसार नो-बॉल वर फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतो.

मात्र पुढील चेंडूवर हार्दिक आऊट झाला, शॉर्ट थर्ड मॅनवर ब्लेसिंग मुझरबानीने त्याला झेलबाद केले. त्यानंतर सूर्यकुमारने शेवटच्या षटकाच्या चार चेंडूंमध्ये दोन षटकार आणि एक चौकार मारत भारताला 186 धावांपर्यंत नेले.