चहल म्हणाला, या दोघांमुळे कुलदीप सोबतची साथ तुटली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kuldeep Yadav and Yuzvendra Chahal

चहल म्हणाला, या दोघांमुळे कुलदीप सोबतची साथ तुटली!

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सोबतची न खेळण्याच्या मुद्यावर भाष्य केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली कुलदीप-चहल जोडीने प्रतिस्पर्धी संघाला नाचवल्याचे सर्वांनी पाहिले आहे. मात्र टीम इंडियाच्या नेतृत्वाथ झालेली खांदेपालट आणि धोनीने संघातून निवृत्ती घेतल्यापासून ही जोडगोळी एकत्र खेळताना दिसत नाही. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे कुलदीपची साथ सुटली, असे त्याने म्हटले आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात रविंद्र जेडेजाला संघात स्थान मिळाले आणि कुलदीपची साथही तुटली, असे तो म्हणाला.

हेही वाचा: द्रविड कोच होताच पाकिस्तानमधून उमटली अशी प्रतिक्रिया

2019 वर्ल्ड कपपूर्वी कुलदीप आणि चहल या जोडीने खास दबदबा निर्माण केला होता. सलग दोन वर्षे या जोडगोळीने आपल्या फिरकीसमोर प्रतिस्पर्ध्यांना अक्षरश: नाचवल्याचे सर्वांनी पाहिले. ही जोडी "कुल्चा" नावाने लोकप्रिय झाली होती. मीडल ओव्हर्समध्ये ही जोडी संघाला विकेट मिळवून देण्यात यशस्वी ठरायची. याचा टीम इंडियाला अनेक सामन्यात फायदा झाला.

हेही वाचा: "धवन भाई कॅप्टन्सीचा सही ऑप्शन"

2019 वर्ल्ड कपनंतर या जोडगोळीला नावाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर दोन्ही गोलंदाजांना एकत्रित संधी मिळणे अवघड झाले. स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये चहल म्हणाला की, हार्दिक पांड्याची दुखापत आणि त्यानंतर रविंद्र जडेजाने केलेले कमबॅक यामुळे आम्हाला एकत्रित खेळणे मुश्किल झाले. तो पुढे म्हणाला की, ज्यावेळी मी आणि कुलदीप खेळायचो त्यावेळी हार्दिक पांड्याही गोलंदाजी करायचा. 2018 मध्ये हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर जड्डू पाजीनं कमबॅक केले. टीम कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल झाला. त्यामुळे आम्हाला एकत्र खेळवण्याती संधीच मिळाली नाही. अष्टपैलूच्या रुपात रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर बॅटिंग करायचा आणि गोलंदाजीतही उपयुक्त ठरायचा, असेही चहलने सांगितले.

loading image
go to top