"धवन भाई कॅप्टन्सीचा सही ऑप्शन" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 shikhar dhawan and Deepak Chahar

"धवन भाई कॅप्टन्सीचा सही ऑप्शन"

श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेशिवाय श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे देण्यात येईल, अशी चर्चा जोर धरत आहे. भारतीय क्रिकेट संघातील युवा गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) अनुभनी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) हाच कॅप्टन्सीता योग्य पर्याय असेल, असे म्हटले आहे.

टीम इंडिया जुलै मध्ये तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी तयारी करत असताना दुसऱ्या बाजूला श्रीलंका दौऱ्याची मोर्चे बांधणी सुरु आहे. धवनच्या नेतृत्वाखाली संघ श्रीलंकेमध्ये खेळणार असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयकडून यासंर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा: इंग्लंड दौऱ्यासाठी विकेटमागे तगडा 'बॅकअप'

भारतीय संघाचा युवा गोलंदाज दीपक चाहरने श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनकडे नेतृत्व देण्याच्या मुद्याचे समर्थन केले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपक चाहर म्हणाला की, शिखर भाई कॅप्टन्सीसाठी योग्य पर्याय आहे. तो खूप दिवसांपासून टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करत असून त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. संघाचे नेतृत्व हे सिनियर खेळाडूकडेच द्यायला हवे. संघातील इतर खेळाडू सिनियर खेळाडूचा सन्मान करतात आणि त्यांनी सांगितेल्या गोष्टी प्रामाणिकपणे करतात, असेही दीपक चाहर यावेळी म्हणाला.

हेही वाचा: राणादाच्या बायकोची कमाल; सोशल मीडियावर व्हिडिओ करतोय धमाल

चाहर स्वत: श्रीलंका दौऱ्यासाठी उत्सुक आहे. आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केल्यामुळे आत्मविश्वास दुणावलाय. श्रीलंका दौऱ्यावर कामगिरीतील सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील राहिन. श्रीलंका दौऱ्यावर जाणारे दुसरा ताफा प्रमुख संघा इतकाच मजबूत असल्याचा विश्वासही दीपक चाहरने यावेळी व्यक्त केलाय.

loading image
go to top