द्रविड कोच होताच पाकिस्तानमधून उमटली अशी प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Rahul Dravid

द्रविड कोच होताच पाकिस्तानमधून उमटली अशी प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour 2021) जाणार आहे. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या दौऱ्याची माहिती देताना म्हटले होते की, भारताची की व्हाईट बॉल स्पेशलिस्ट टीम श्रीलंका दौऱ्यावर जाईल. याच वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यात व्यस्त असेल त्यामुळे कोचिंग स्टाफही त्यांच्यासोबत असेल. यापरिस्थितीत मर्यादित सामन्यात श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी भूमिका बजावताना दिसणार आहे. राहुल द्रविड कोच झाल्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: "धवन भाई कॅप्टन्सीचा सही ऑप्शन"

सलमान बट्ट म्हणाला की, राहुल द्रविडने कोच बनण्यापूर्वी आपले काम केले आहे. राहुल द्रविडने युवा खेळाडूंना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत अगोदरच टीम इंडियाच्या दरवाज्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. श्रीलंका दौऱ्यावर केवळ मॅचवेळी कोणत्या रणनितीने मैदानात उतरायचे आणि कोणाला खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायचे एवढेच आव्हान द्रविडसमोर असेल. राहुल द्रविडमुळेच भारताच्या ज्युनियर टीमने दर्जेदार खेळ करुन दाखवला आहे. इंडिया 'ए' आणि अंडर-19 टीमच्या यशाचे श्रेय हे द्रविडलाच द्यावे लागेल.

हेही वाचा: इंग्लंड दौऱ्यासाठी विकेटमागे तगडा 'बॅकअप'

सलमान बट्ट सध्या भारतीय संघावर मेहरबान झाल्याचे पाहायला मिळते. कुलदीप यावदला सल्ला आणि विराट कोहलीचे समर्थन करुन सलमान बट्टने भारतीय खेळाडूंवरचे प्रेम यापूर्वी दाखवून दिले आहे. इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर मायकल वॉन याने कोहलीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोहली आणि विल्यमसनची तुलना करताना त्याने कोहली हा भारतीय खेळाडू असल्यामुळे आणि त्याचे फॅन फॉलोवर्स अधिक असल्यामुळे सर्वोत्तम आहे, असे वॉन म्हणाला होता. यावर सलमान बट्टने त्याची शाळा घेतली होती. कोहलीच्या खात्यात 70 शतके आहेत. तुला एकही शतक करता आलेले नाही, असा टोला लगावत त्याने विराट कोहलीचे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले होते.

loading image
go to top