Hardik Pandya Injury : हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर BCCI ने त्वरित केलं ट्विट, म्हणाले...

BCCI immediately tweeted on Hardik Pandya's injury, saying...
Hardik Pandya Injury
Hardik Pandya Injuryesakal
Updated on

Hardik Pandya Injury : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्याचा घोटा दुखावला असून त्याने आपले षटक पूर्ण न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला. आता बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली आहे. त्याच्या दुखऱ्या घोट्याचे स्कॅन होणार आहे.

Hardik Pandya Injury
Virat Kohli : बांगलादेशची आक्रमक सुरूवात... हार्दिकनं सोडलं मैदान अन् विराटने तब्बल 6 वर्षांनी वनडेत केली गोलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने दमदार सुरूवात केली. सलामीवीर तन्जिद हसन आणि लिटन दास यांनी 93 धावांची सलामी दिली. बांगलादेशचा आक्रमक अवतार पाहून कर्णधार रोहित शर्माने आपल्या भात्यातील सर्व अस्त्र, सर्व गोलंदाज वापरून पाहिले.

दरम्यान, त्याने सामन्याचे नववे षटक हे हार्दिक पांड्याला दिले. मात्र पहिल्या तीन चेंडूतच दोन चौकार खाणारा हार्दिक दुखापतग्रस्त झाला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पायाने आडवण्याच्या प्रयत्नात हार्दिकचा पाय मुरगळला. त्याच्या घोट्याला इजा झाली अन् तो मैदानावरच बसला.

Hardik Pandya Injury
Padma Award : ऑलिम्पिकवीर खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी प्रयत्न करू; खासदार पी. टी. उषा यांचं आश्वासन

अखेर फिजिओ हार्दिक पांड्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. हार्दिक पांड्याचे अर्धवट राहिलेले षटक हे विराट कोहलीने पूर्ण केले. त्याने उर्वरित तीन षटकात दोन धावाच दिल्या. विशेष म्हणजे तब्बल सहा वर्षांनी विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरूद्ध कोलंबोत 2017 मध्ये गोलंदाजी केली होती.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दमदार सुरूवात करणाऱ्या बांगलादेशला नंतर भारतीय फिरकीपटूंनी वेसन घातलं. कुलदीप यादवने तन्जिद हसनला 51 धावांवर बाद केलं. त्यानंतर रविंद्र जडेजाने शान्तो (8) आणि लिटन दास (66) यांची शिकार केली. मोहम्मद सिराजने देखील मेहदी हसन मिराजला देखील बाद करत बांगलादेशची अवस्था 4 बाद 137 धावा अशी केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com