Virat Kohli : बांगलादेशची आक्रमक सुरूवात... हार्दिकनं सोडलं मैदान अन् विराटने तब्बल 6 वर्षांनी वनडेत केली गोलंदाजी

Virat Kohli
Virat Kohliesakal

Virat Kohli : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने नवव्या षटकातच अर्धशतक धावफलकावर लावला. रोहित शर्माने बांगलादेशच्या या सलामीवीरांना रोखण्यासाठी 10 षटकात तब्बल सहा गोलंदाज वापरले. विशेष म्हणजे विराट कोहलीने देखील गोलंदाजी केली.

Virat Kohli
IND Vs BAN World Cup Live : तन्जिद हसनचे आक्रमक अर्धशतक, अखेर कुलदीपने जोडी फोडलीच

रोहित शर्माने नवव्या षटकाचे पहिले तीन चेंडू झाल्यावर विराट कोहलीकडे चेंडू सोपवावा लावला. हे षटक हार्दिक पांड्या करत होता. मात्र पहिल्या तीन षटकात दोन चौकार खाल्यानंतर पांड्याच्या पायाला दुखापत झाली. हार्दिक पांड्या स्ट्रेट ड्राईव्ह पायाने आडवण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्याला दुखापत झाली. त्याचा घोटा ट्विस्ट झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले.

हार्दिक षटक अर्धवट टाकून पॅव्हेलियनमध्ये परतला. पांड्याचे हे अर्धवट राहिलेले षटक विराट कोहलीने पूर्ण केले. त्याने तीन चेंडूत दोन धावा देत आपला स्पेल यशस्वी ठरवला.

Virat Kohli
IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यात शेवटच्या क्षणी बदलला कर्णधार, 'या' खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा

विराट कोहलीची वर्ल्डकपमधील गोलंदाजी

  • 2011 अहमदाबाद, क्वार्टर फायनल, भारत - ऑस्ट्रेलिया, 1 षटक 6 धावा, विकेट शुन्य

  • 2011 मुंबई, फायनल, भारत - श्रीलंका, 1 षटक 6 धावा, विकेट शुन्य

  • 2015 सिडनी, सेमी फायनल, भारत - ऑस्ट्रेलिया, 1 षटक 7 धावा, विकेट शुन्य

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये शेवटची गोलंदाजी 2017 मध्ये केली होती. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या कोलंबो येथील सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता त्याने थेट बांगलादेशविरूद्ध वर्ल्डकपमध्ये पुण्यात गोलंदाजी केली.

बांगलादेशचे सलामीवीर तन्जिद हसन - लिटन दास यांनी 93 धावांची खणखणीत भागीदारी रचली. अखेर ही जोडी कुलदीप यादवने फोडली. त्याने 43 चेंडूत 51 धावा करणाऱ्या तन्जिदला बाद केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com