Hardik Pandya : पांड्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मोठी भुमिका निभावण्यास तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Ready To Fulfill 3rd Bowler Roll In Up Coming T20 World Cup

Hardik Pandya : पांड्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मोठी भुमिका निभावण्यास तयार

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) दुखापतीतून सावरत भारतीय संघात झोकात पुनरागमन केले आहे. त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत संघाला पदार्पणाच्या हंगामातच आयपीएल टायटल मिळवून दिले. तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली भुमिक सध्या तरी चोख बजावत आहे. काही महिन्यातच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप स्पर्धा (T20 World Cup 2022) सुरू होणार आहे. या स्पर्धेत हार्दिक पांड्या मोठी जबाबदारी पार पाडण्यास सज्ज झाला आहे.

हेही वाचा: PHOTO'S | CWG 2022 : वडिलांच्या हत्येतून सावरत तुलिका मानने रौप्य पदक केले पक्के

हार्दिक पांड्या म्हणाला की, 'मी कायमच गोलंदाजीचा आनंद घेत आलो आहे. मी यापूर्वी देखील अनेकवेळा सांगितले आहे की मला गोलंदाजीत पूर्ण क्षमतेने पुनरागमन करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मी ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यावेळी संघाचे संतुलन आणि कर्णधाराला विश्वास मिळत असतो.'

हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केल्यानंतर त्याच्याकडून कधी कधीच पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करून घेण्यात आली. आता हळूहळू तो आपला गोलंदाजीचा कोटा पूर्ण करत आहे. त्याने वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात चार षटकात 19 धावा देत 1 विकेट घेतली. भारताने हा सामना सात विकेट्सनी जिंकला. सध्या भारत 5 सामन्यांच्या मालिकेत 2 - 1 असा आघाडीवर आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माने स्वतः दुखापतीबद्दल दिले अपडेट, म्हणाला...

विंडीज विरूद्धचा सामना झाल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, 'सामन्यात माझा 'फिलर' (काम चलाऊ गोलंदाज) म्हणून वापर करून घेण्यात आला. मात्र आता मी सांगू शकतो की मी तिसऱ्या किंवा चौथ्या गोलंदजाची भुमिका बजावू शकतो. मी माझ्या कोट्यातील चार षटके गोलंदाजी करू शकतो. मी ज्या प्रमाणे फलंदाजीत आपले योगदान देतो तेवढेच योगदान मी गोलंदाजीतही देऊ शकतो.'

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, 'आयुष्यात मला जे काही मिळाले आहे त्यासाठी मी आभारी आहे. जर तुम्ही सच्चेपणाने कष्ट करता त्यावेळी आयुष्यात तुम्हाला कितीही चढ उतार पहावे लागले तरी त्याचा फायदा होतोच.'

Web Title: Hardik Pandya Ready To Fulfill 3rd Bowler Roll In Up Coming T20 World Cup

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..