IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का, हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध सामन्यातून बाहेर, कधी परतणार संघात?

Hardik Pandya ruled out of India vs England
Hardik Pandya ruled out of India vs England

Hardik Pandya injury update India vs England : वर्ल्ड कपमध्ये या रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी आली आहे. ही बातमी टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याबाबत आहे. तो अजून पण दुखापतीतून बरा झाला नाही, आणि त्यामुळे वर्ल्ड कपचे पुढील दोन तो खेळणार नाही.

याचा अर्थ पांड्या रविवारी इंग्लंड आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघाचा भाग असणार नाही. तो थेट 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या दोन साखळी सामन्यांसाठीच उपलब्ध असेल.

Hardik Pandya ruled out of India vs England
पांड्या आला तर शमी Playing-11 मधून बाहेर अन् ठाकूरची एन्ट्री, दिग्गज खेळाडूचे मोठे वक्तव्य

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याने गोलंदाजी केलेली नाही. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये पांड्याला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी काही दिवस थांबावे लागले.

पांड्या मुंबई किंवा कोलकाता येथे भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ व्यवस्थापन पांड्याच्या पुनरागमनाची घाई करू इच्छित नाही. शेवटच्या दोन साखळी सामन्यांसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा संघाला आहे. या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ विजयी मार्गावर आहे, त्यामुळे संघ व्यवस्थापनाला उपांत्य फेरीसाठी पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त हवा आहे.

हार्दिक पांड्या 22 ऑक्टोबरला धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळला नाही आणि त्याला उपचारासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. सुरुवातीला पांड्या 29 ऑक्टोबरला होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा होती, पण चाचण्या आणि स्कॅननंतर परिस्थिती बदलली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com