Hardik Pandya : मी फक्त एक नवखा मुलगा होतो, धोनीने...

Hardik Pandya MS Dhoni
Hardik Pandya MS Dhoniesakal

दुबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आशिया कपमधील पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने 3 विकेट्स आणि 17 चेंडूत नाबाद 33 धावा करून भारताच्या विजयात मोठे योगदान दिले. हार्दिक पांड्या ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून बाहेर गेला होता. 4 वर्षांनी तेच मैदान त्याने गाजवले. दरम्यान, त्याने सामन्यानंतर त्याच्या प्रगतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. (Hardik Pandya Says MS Dhoni Played Big Role In My Growth Asia Cup 2022)

Hardik Pandya MS Dhoni
Hardik Pandya : पाकिस्तानविरुद्धच्या एका षटकारमुळे पांड्याने मारली ICC रॅंकिंगमध्ये मोठी झेप

हार्दिक पांड्याने या वर्षी अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. मग आपले गमावलेले अष्टपैलूत्व पुन्हा मिळवून धडाकेबाज कामगिरी करणे, गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यानंतर पहिल्याच आयपीएल हंगामात आयपीएल टायटल जिंकून देणे अशा अनेक कामगिरी त्याने केल्या आहेत.

यंदाच्या आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने अष्टपैलू कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. यानंतर स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पांड्या म्हणाला की, 'मी फक्त एक नवखा मुलगा होतो ज्याला आयुष्य आणि खेळाबद्दल नव्या गोष्टी शिकायच्या होत्या. माझ्या प्रगतीत महेंद्रसिंह धोनीचा मोठा वाटा आहे. ज्यावेळी मला संधी मिळते त्यावेळी मी धोनीचे निरीक्षण करतो आणि गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर निरीक्षण केले तर त्याच्याकडे जी मानसिकता आणि ज्ञान आहे त्या गोष्टी मी मैदानावर माझ्या व्यक्तीमत्वात परावर्तित करण्याचा प्रयत्न करतो.'

Hardik Pandya MS Dhoni
Rishabh Pant : टीम इंडियातून ऋषभ पंत 'बाहेर' अन् भारतीय खेळाडूंना माहित नाही कारण

जबाबदारी घेण्याबद्दल हार्दिक पांड्या म्हणतो की, 'मी माझ्या चुकांची जबाबदारी घेतो. मी जोखीम घेतो, अपयशी ठरतो आणि त्यातून शिकतो. कधी कधी अपयश तुम्हाला शिकवून जातं. तुमचा जवळचा व्यक्ती, सहाय्य करण्याऱ्या व्यक्ती, इतकंच काय माही भाई देखील शिकवू शकत नाही ते तुमचं अपयश शिकवून जातं. काही अपयश अशी असतात ती फक्त अनुभवायची असतात. तुम्ही त्यातून शिकत जाता.' हार्दिक म्हणाला की त्याला अपयशामुळे त्याचा रोल काय आहे हे चांगल्या प्रकारे समजलं. कोणत्या भुमिकेत हार्दिक फिट बसू शकतो, ती भुमिका चांगल्या प्रकारे कशी पार पाडता येईल हे अपयशामुळे शिकायला मिळालं. गोष्टी कशा घडत गेल्या हे मी शब्दात सांगू शकत नाही.

हार्दिक पांड्या मॅच फिनिशरच्या कलेबद्दल म्हणतो की, 'तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तेथील जेवण खूप चांगलं असू शकतं मात्र जर त्याला फिनिशिंग टच चांगल्या प्रकारे दिला नाहीत तर ते जेवण कितीही चांगले असले तरी त्या जेवणातील चार्म निघून जातो. त्यामुळे ते जेवण किंवा डिश कशी दिसते हे देखील तितकेच महत्वाचे असते. असंच खेळाचं देखील असतं, तुम्ही विजयाच्या किती जवळ गेला याला महत्व नसतं, तुम्ही कितीही चांगल्या स्थितीत असाल, तुम्ही कितीही मजबूत असाल जर तुमचे फिनिशर फिनिशिंग टच देऊ शकत नसतील तर ते चित्र परीपूर्ण दिसत नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com