Hardik Pandya : पाकिस्तानविरुद्धच्या एका षटकारमुळे पांड्याने मारली ICC रॅंकिंगमध्ये मोठी झेप

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पांड्याने शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Hardik Pandya
Hardik Pandyasakal

ICC T20 Ranking : भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आशिया चषक 2022 मध्ये रविवार पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) त्याच्या चमकदार कामगिरीमुळे ICC रॅंकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

दुबईतील त्याच्या कामगिरीनंतर पांड्या आयसीसी टी-20 क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पांड्याचे रेटिंग गुण 167 आहेत, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने शेवटच्या षटकात सिक्स मारून भारताला विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आशिया चषकाच्या आगामी सामन्यांमध्येही संघाला हार्दिककडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्याच्या क्रमवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Hardik Pandya
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने 25 धावांत तीन बळी घेतले आणि त्यानंतर फलंदाजीच्या जोरावर 17 चेंडूत 33 धावांची दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. हार्दिकला या कामगिरीचा फायदा टी-20 क्रमवारीत झाला आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. तर बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे.

पांड्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर हे वर्ष त्याच्यासाठी खूप चांगले आहे. पांड्याने प्रथम पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएल मध्ये चॅम्पियन बनवले, त्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले. खरे तर 4 वर्षांपूर्वी आशिया चषकादरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पांड्याला दुखापत झाली होती. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले. त्या दुखापतीतून सावरण्यासाठी पांड्याला बराच वेळ लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com