विराट - अनुष्का निघाले हार्दिकच्या 'दुसऱ्या' लग्नाला, नवीन जोडपंही असणार साथीला? | Hardik Pandya Wedding Valentine Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Second Wedding On Valentine Day

Hardik Pandya Wedding : विराट - अनुष्का निघाले हार्दिकच्या 'दुसऱ्या' लग्नाला, नवीन जोडपंही असणार साथीला?

Hardik Pandya Second Wedding On Valentine Day : भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत अवघ्या अडीच दिवसात गुंडळले. यामुळे भारतीय संघांला विश्रांतीसाठी अधिकचे दोन दिवस मिळाले. त्यामुळे टीम इंडियातील अनेक खेळाडू ब्रेकवर गेले आहेत. याचदरम्यान, भारताची टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली. हे लग्न आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच उदयपूर येथे होत आहे.

यादरम्यान, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे देखील मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले. यावेळी या दोघांनीही कॅज्युअल पेहराव केला होता. ते विमानतळावर सहजतेने वावरत होते. विराट आणि अनुष्काने विमानतळावर उपस्थित फोटोग्राफर्सना देखील सहजतेने पोज दिली.

विराट - अनुष्का यांच्याबरोबरच निवविवाहित जोडी अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे देखील मुंबई विमानतळावर दिसले. हे देखील हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या लग्नासाठी उदयपूरला जात आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. विराट आणि अनुष्का देखील पांड्याच्या लग्नाला उदयपूरला जात असल्याच्या कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केली आहे. मात्र केएल राहुल - विराट कोहलीचे व्हॅलेंटाईन डेचे वेगळे प्लॅन्स देखील असू शकतात.

हार्दिक पांड्या आणि नताशा हे व्हॅलेंटाईन डे दिवशी दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. हार्दिक आणि नताशा हे दोघेही उदयपूर येथे आधीच पोहचले आहेत. हार्दिकने लग्नासाठी पॅलेस बूक केला आहे. पांड्याच्या दुसऱ्या लग्नात संगीत, मेहंदी आणि हळद या सारखे पारंपरिक सोहळे देखील होणार आहेत. या लग्नासाठी जवळपास 100 पाहुणे मंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे.

(Sports Latest News)