हार्दिकची ही अवस्था पाहून क्रिकेटप्रेमी हळहळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपट्टू हार्दिक पांड्यावर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. वर्ल्ड कप स्पर्धेतही हार्दिकला दुखापतीनं ग्रासले होते. तरीदेखील ताे वर्ल्ड कप खेळला होता.

दिल्ली ः भारताचा अष्टपैलू क्रिकेटपट्टू हार्दिक पांड्यावर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. वर्ल्ड कप स्पर्धेतही हार्दिकला दुखापतीनं ग्रासले होते. तरीदेखील ताे वर्ल्ड कप खेळला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Surgery done successfully Extremely grateful to everyone for your wishes Will be back in no time! Till then miss me 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

दरम्यान, आता ताे तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिकला मैदानात दुखापत झाली होती. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. या सामन्यातील अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक- हार्दिक पांड्याच्या मुगुंथन या चाहत्यानं स्वतःच्या शरीरावर 16 विविध भाषांत हार्दिकच नाव गोंदवून घेतलं आहे. कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात केलेल्या विवादास्पद वक्तव्यानंतर हार्दिकवर होत असलेली टीका पाहून मुगुंथन बेचैन झाला होता. हार्दिक या प्रकरणातून सुटावा आणि लवकरात लवकर टीम इंडियात त्यानं कमबॅक करावं, अशी प्रार्थना मुगुंथनने केली होती. त्याने हार्दिकची हेअरस्टाईलही कॉपी केली आहे. कोईम्बतूर येथील मुगुंथन हार्दिकला चिअर करण्यासाठी धर्मशाला येथे येत असताना हा अपघात झाला. जवळपास 3000 किमीचे हे अंतर रस्त्यामार्गे गाठायचा निर्धार मुगुंथनने केला. 2000 किमचे अंतर पार केल्यानंतर जबलपूर येथे त्याचा अपघात झाला. त्याला त्वरीत नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. वाऱ्याच्या वेगानं ही बातमी हार्दिकला समजली... मुगुंथनच्या अपघाताचे वृत्त कानावर पडताच हार्दिक अस्वस्थ झाला. त्याने त्वरित मुगुंथनच्या उपचाराचा सर्व खर्चाचा भार उचलला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hardik pandya walks crutche safter surgery