HARISHCHANDRA BIRAJDAR: २० किलो वजनाचा फरक तरीही आव्हान स्वीकारलं; १४ मिनिटांत सतपाल सिंगला चीतपट करणाऱ्या बिराजदार मामांची गाजलेली कुस्ती

Harishchandra Birajdar vs Satpal Singh: ११ जानेवारी १९७७ रोजी बेळगावमध्ये हरिश्चंद्र बिराजदार मामा आणि सतपाल सिंग यांच्यात गाजलेली कुस्ती झाली. तब्बल २० किलो वजनाचा फरक असूनही बिराजदार मामांनी सतपालला अवघ्या १४ मिनिटांत चीतपट केलं.
HARISHCHANDRA BIRAJDAR

HARISHCHANDRA BIRAJDAR

esakal

Updated on

Harishchandra Birajdar vs Satpal Singh: सत्तरच्या दशकात सतपाल सिंगचा भारतीय कुस्तीच्या आखाड्यात मोठा दबदबा होता. जवळपास १०० किलो वजन आणि सव्वा सहा फूट उंची असलेला सतपाल अनेक मोठ्या मल्लांना पराभूत करत होता.

मात्र, त्याच काळात महाराष्ट्राच्या हरिश्चंद्र बिराजदार मामांनी त्याला कुस्तीचं आव्हान दिलं. दोघांच्या वजनात जवळपास २० किलोचा फरक होता. तरीही महाराष्ट्राच्या मल्लाचा मान जपण्यासाठी बिराजदार मामांनी हे आव्हान स्वीकारलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com