दोस्ती अन् कुस्ती : हर्षवर्धन-शैलेशच्या खिलाडूवृत्तीचा मेरी-झरीनने घ्यावा आदर्श!

Boxing-Wrestling
Boxing-Wrestling

मुंबई : बॉक्‍सिंग आणि कुस्ती तसे दोन्ही खेळ रिंगमधले... त्याहूनही शरीरवेधी... म्हणजे राग, आक्रमकता प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दाखवण्याची संधीच जणू कोणी जुने हिशेब पूर्ण करतो, तर कुणी प्रतिस्पर्ध्यांना खांद्यावर घेऊन नाचतो.

एकमेकांबद्दलचा आदर राखण्याचा मार्ग खेळातून सापडतो हे मेरी-झरीन या महिला मुष्टियोद्‌ध्यांना जमले नाही, ते आपल्या मातीतील हर्षवर्धन सदगिर आणि शैलेश शेखले यांनी दाखवून दिले. 

जेमतेम आठवडाभरातील दोन घटना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या दोन बाजू दाखवणाऱ्या ठरल्या आहेत. खेळात हार-जीतप्रमाणे श्रेष्ठत्वाचीही लढाई होत असते, पण मराहाष्ट्र केसरीत श्रेष्ठ ठरूनही मित्र असलेल्या आपल्या सहकाऱ्याला तेवढाच सन्मान देण्याचा मोठेपणा हर्षवर्धनने दाखवला आणि तमाम जनतेची मने जिंकली. महाराष्ट्र केसरी या मानाच्या गदेपेक्षा त्यांनी शैलेशचा उचलेले भार सर्वार्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीची यशोगाथा सांगणारा होता. 

विख्यात कुस्तीपटू आणि आत्ताचे मार्गदर्शक काका पवार यांच्या तालमीत केवळ कुस्तीचे धडे आणि डावच शिकवले जातात असे नाही, तर मित्रत्वाचीही भावना जोपासली जाते हे सिद्ध झाले. त्यामुळे पराभूत होऊनही शैलेश निराश झाला नव्हता आणि जिंकूनही हर्षवर्धनच्या आनंदात उन्माद नव्हता. पराभूत झालो असतो तरी निराश झालो नसतो, हे हर्षवर्धनचे उद्‌गार सर्व काही स्पष्ट करणारे आहे. 

मेरीची अखिलाडूवृत्ती 
एकीकडे महाराष्ट्रातील ही कुस्ती आदर्श निर्माण करत असताना भारतीय क्रीडा क्षेत्राताने मेरी कोम आणि झरीन निकत यांची खुन्नसही पाहिली होती. ऑलिंपिक पात्रता संघात कोणाला स्थान मिळणार यापेक्षा एकमेकींममध्ये श्रेष्ठ कोण याचीच ती लढत होती. रिंगणात जेवढा त्वेषाने खेळ केला जातो, तेवढीच खिलाडूवृत्ती सामन्यानंतर दाखवणे हीच खिलाडूवृत्ती होती, पण मेरी आणि झरीन 'त्या' लढतीनंतरही शाब्दिक ठोसे मारत राहिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com