India at Paralympic 2024 : हरविंदरचं ऐतिहासिक सुवर्ण पदक! आजपर्यंत कोणत्याच भारतीय तिरंदाजाला न जमलेला पराक्रम करून दाखवला

Paris Paralympic Harvinder singh: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा तिरंदाज हरविंदरने गोल्ड मेडल जिंकत इतिहासात त्याचं नावही सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
Harvinder singh
Harvinder singhSakal
Updated on

Paralympic 2024 Harvinder singh Gold Medal in Archery: पॅरालिम्पिक स्पर्धा इतिहासात सर्वाधिक पदकांचा विक्रम भारताने पॅरिसमध्ये नोंदवला. पदकांचा हा ओघ बुधवारीही सुरूच राहिला. सांगलीच्या सचिन खिलारीच्या रौप्यपदकानंतर भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

याबरोबरच हरविंदर सिंगचे नाव भारतीय क्रीडा इतिहासातही सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. त्याने पुरुषांच्या पॅरा तिरंदाजी रिकर्व्ह ओपन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तो सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिलाच पॅरा तिरंदाज आहे.

आत्तापर्यंत कोणत्याच भारतीय तिरंदाजाचे पॅरालिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली नव्हती. त्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी खेळणाराही तो पहिलाच भारतीय ठरला.

हरविंदरने याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. होते. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकला ६-० अशा फरकाने पराभूत केले.

हरविंदर हा अर्जुन पुरस्कार विजेताही खेळाडू आहे. त्याचबरोबर उच्च पदवीधरही आहे. त्याने पटीयालामध्ये विद्यापीठात शिक्षण घेत असताना तिरंदाजी करताना खेळाडूंना पाहिले, त्यानंतर २०१२ पॅरालिम्पिकमध्ये हा खेळ पाहून त्याला प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्याने तिरंदाजीला सुरुवात केली.

त्याने २०१८ मध्ये आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. ते सुवर्णपदक त्याच्यासाठी खूप भावनिक ठरले होते. त्याच्या स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे त्याने ते पदक आईला समर्पित केले होते. आता तो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक विजेता ठरला आहे.

त्याने पंजाबी विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवीही मिळवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com