Heinrich Klaasen
Heinrich Klaasen esakal

Heinrich Klaasen : स्लॉग ओव्हरमध्ये आफ्रिकेचा ऐतिहासिक धडाका; क्लासेन दमला मात्र नाही थांबला

Published on

Heinrich Klaasen : दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज हेन्रिच क्लासेनने वानखेडे स्टेडियममध्ये रणरणत्या उन्हात दमदार शतकी खेळी केली. त्याने 67 चेंडूत 109 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर 400 धावांचे आव्हान ठवले. विशेष म्हणजे आफ्रिकेने शेवटच्या 10 षटकात 143 धावा चोपल्या.

क्लासेनने मार्को येनसेनसोबत सातव्या विकेटसाठी 6 व्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली. मार्को येनसेनने 42 चेंडूत 75 धावांची झुंजार खेळी केली. क्लासेन आपल्या शतकी खेळीवेळी सातत्याने खाली बसत होता. त्याला मुंबईतील दमट आणि उष्ण वातावरणाचा प्रचंड त्रास होत होता. तरी त्याने शेवटपर्यंत फलंदाजी केली. आ

Heinrich Klaasen
Netherlands vs Sri Lanka : रडत खडत का असेना लंकेनं खातं उघडलं; नेदरलँडचं कडव आव्हान लावलं परतवून

गतविजेते इंग्लंड आणि यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 400 चा धमाका पहिल्यांदा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला. एडीन माक्ररमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आत आपली सुरूवात खराब केली होती.

सलामीवीर क्विंटन डिकॉक पहिल्याच षटकात 4 धावा करून बाज झाला होता. मात्र त्यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि वॅन डेर दुसेनने 20 षटकात 121 धावांची भागीदारी रचत आफ्रिकेला 125 धावांपर्यंत पोहचवले होते.

हे दोघांच्या दमदार सुरूवातीनंतर आफ्रिका पुन्हा एकदा 400 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होतं. मात्र इंग्लंडच्या आदिल रशीदने आधी 60 धावा करणाऱ्या दुसेनला आणि त्यानंतर 85 धावा करणाऱ्या रीझाला बाद करत मोठे धक्के दिले.

Heinrich Klaasen
Michael Vaughan : रोहितनं डीजेसोबत आधीच सेटिंग लावलं... 'दिल दिल पाकिस्तान'वरून वॉन काय म्हणाला?

त्यानंतर कर्णधार माक्ररमने 42 धावांचे योगदान देत आफ्रिकेला 200 चा टप्पा 30 षटकाच पार करून दिला. त्याला हेन्री क्लासेन चांगली साथ देत होता. मात्र रीस टोप्लेने आधी माक्ररम आणि नंतर डेव्हिड मिलरला बाद करत आफ्रिकेला टेन्शन दिले. यामुळे त्यांची धावगती देखील मंदावली होती.

37 षटकात 5 बाद 243 धावा अशी अवस्था झालेली आफ्रिका आता काही 400 धावांचा टप्पा पार करणार नाही. असे वाटत होते. मात्र क्लासेनने झुंजार खेळी करत मार्को येनसेनसोबत 151 धावांची भागीदारी रचली. क्लासेनने 63 चेंडूत 109 धावा ठोकल्या. अखेर तो शेवटच्या षटकात बाद झाला. त्यावेळी आफ्रिका 394 धावांपर्यंत पोहचली होती.

मार्को येनसेनने नाबाद 75 धावा केल्या मात्र त्याला आफ्रिकेला 400 धावांचा टप्पा पार करून देता आला नाही. शेवटच्या षटकात 5 धावाच झाल्याने आफ्रिका 50 षटकात 7 बाद 399 धावांपर्यंत पोहचली. त्यामुळे आफ्रिकेची यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा 400 धावा करण्याची संधी हुकली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com