पॅट कमिन्स IPL स्पर्धेमधून बाहेर, मायदेशी लवकरच परतणार

प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे.
Pat Cummins leaves IPL 2022 early with hip injury
Pat Cummins leaves IPL 2022 early with hip injury esakal

प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला(Pat Cummins) दुखापत झाली असुन तो संपूर्ण आयपीएल टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे. तसेच तो, लवकरच त्याच्या मायदेशी परतणार आहे.

यंदाच्या आयपीएल 15 व्या सीझनमध्ये पॅट कमिन्सचे कामगिरी विशेष अशी कामगिरी केलेली नाही. त्याला केवळ एकच मॅच जिंकवण्यात यश मिळाले आहे. मात्र, गोलंदाजीमध्ये तो खास कामगिरी करु शकला नाही. त्याच्या कंबरेला दुखापत झाल्याने तो मायदेशी परतत आहे. तो आगामी संपूर्ण टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे. आयपीएल संपण्यापूर्वीच तो त्याच्या मायदेशी परतणार आहे. मात्र, त्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.

Pat Cummins leaves IPL 2022 early with hip injury
VIDEO मुंबईच्या 'या' गोलंदाजाचा डेब्यू सर्व बटालियनने प्रोजेक्टरवर पहिला

जून आणि जुलै मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी 20, पाच वनडे आणि दोन टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. कमिन्स टेस्ट टीमचा कर्णधार आहे.

कमिन्सला कोलकाताने 7.25 कोटीला विकत घेतले होते. कमिन्सने सुरुवातीच्या मॅचमध्ये तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. मात्र, एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याला काही सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं होते. त्याने पाच मॅचमध्ये 262.50 स्ट्रईक रेटने 63 धावा केल्या. तर 19.5 ओव्हरमध्ये त्याच्या नावावर सात विकेट आहेत.

Pat Cummins leaves IPL 2022 early with hip injury
सामना सुरू असताना अचानक पिचवर झोपला Ben Stokes, काय आहे कारण?

आयपीएल दरम्यान त्याचा स्नायू दुखावला. त्याला झालेली दुखापत बरी होण्यास फार कालावधी लागणार नाही. मात्र, श्रीलंका दैऱ्यापूर्वी त्याला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे तो मायदेशी परतत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com