
सामना सुरू असताना अचानक पिचवर झोपला Ben Stokes, काय आहे कारण?
क्रिकेट जगतात सध्या आयपीएल स्पर्धेसह काऊंटी चॅम्पियनशिप देखील सुरू आहे. डरहम आणि ग्लेमोर्गन यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान एक मजेशीर किस्सा घडला. सामना सुरु असतानाच इंग्लंडचा टेस्ट कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) अचानक पिचवर झोपला. आणि त्यानंतर जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
हेही वाचा: VIDEO मुंबईच्या 'या' गोलंदाजाचा डेब्यू सर्व बटालियनने प्रोजेक्टरवर पहिला
ऑस्ट्रेलिया क्रिकेटर मार्नस लाबुशेनच्या बॉऊन्सर स्टोक्सच्या कंबरेखाली लागला. त्यानंतर अचानक तो पिचवर झोपला. मात्र, स्टोक्सला काहीच दुखापत झाली नव्हती. तरीसुद्धा त्याने काही वेळ पिचवर झोपून मैदानातील सहकाऱ्यांची आणि प्रेक्षकांची त्याने फिरकी घेतली. त्यामुळे काही वेळ मैदानातील परिस्थीती गंभीर बनली होती.
थोड्यावेळाने अचानक उभे राहत तो खेळण्यासाठी सज्ज झाला. त्याने केलेल्या या मजेमुळे सर्वजण चिंतते असल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा: बसमध्ये पाँटिंगची एंट्री होताच, दिल्लीच्या खेळाडूंनी गायले ‘सैयाँ’, VIDEO
त्यानंतर त्याने तुफानी खेळी केली. त्याने 150 मिनीटांची खेळी खेळत 110 चेंडूवर त्याने 85 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार आणी 2 षटकारांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी बेन स्टोक्सने काऊंटी मॅचमध्ये वूस्टरशायरविरुद्ध जोश बेकरच्या एका ओव्हरमध्ये 34 धावा ठोकून खळबळ उडवून दिली होती. डरहमकडून खेळताना, बेन स्टोक्सने वॉर्सेस्टरशायरविरुद्ध जोश बेकरच्या 6 चेंडूत 34 धावा केल्या, ज्यात 5 षटकार आणि 1 चौकार समावेश होता
Web Title: Marnus Labuschagne Floors Ben Stokes With Short Ball In County Championship Clash
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..