IND vs PAK Hockey : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं! शेवटच्या क्षणी टीम इंडियाचा विजय

IND vs PAK Hockey : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं! शेवटच्या क्षणी टीम इंडियाचा विजय

Hockey 5s Asia Cup 2023 : एकीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा श्रीलंकेच्या कॅंडीवर होत्या, जिथे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदिवसीय आशिया कपमध्ये आमनेसामने होते. तो सामना पावसामुळे रद्द झाला.

दरम्यान, दुसरीकडे हॉकी 5s पुरुष आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू होता. यामध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली.

IND vs PAK Hockey : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं! शेवटच्या क्षणी टीम इंडियाचा विजय
IND vs PAK: भारत-पाक थरार पावसामुळे रद्द; 10 तारखेला पुन्हा मिळणार संधी? जाणून घ्या समीकरण

हॉकी 5s फॉरमॅटमध्ये 5 खेळाडू मैदान घेतात. मनदीप मोर (कर्णधार), सूरज करकेरा, जुगराज सिंग, मनिंदर सिंग आणि पवन राजभर यांनी भारतासाठी अंतिम फेरीत मैदानात उतरले. हा सामना खूपच रोमांचक होता. ज्यात एके काळी पाकिस्तानचे 3 गोल होते तर भारताचे 2 गोल होते. भारत एका गोलने पिछाडीवर होता, मात्र अखेरच्या क्षणांमध्ये भारताने 1 गोल करत गुणसंख्या 4-4 अशी बरोबरी केली.

IND vs PAK Hockey : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं! शेवटच्या क्षणी टीम इंडियाचा विजय
Asia Cup 2023 IND Vs PAK Score : पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द! चाहत्यांच्या अपेक्षांवर धो-धो पाऊस...

यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे सामनाचा निकाल लागला. पेनल्टी शूट-आऊटमध्ये भारताने पाकिस्तानचा 2-1अशा पराभव केला. हा विजय मिळवला आणि स्पर्धाही जिंकली. आता भारतीय हॉकी संघ 5s हॉकी विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे भारताने 35 गोल करत जपानी संघाचा पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com