Asian Champions Trophy: हॉकी इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asian Champions Trophy Hocky India
Asian Champions Trophy: हॉकी इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार

Asian Champions Trophy : हॉकी इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार

आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजयापासून दूर राहिलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने सेमी फायनल गाठलीये. दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर हॉकी इंडियाने विजयी धडाका सुरु केला. ढाकामध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये त्यांच्यासमोर आता जपानच्या हॉकी संघाचे आव्हान असणार आहे. मंगळवारी 21 डिसेंबरला दोन्ही संघातील सेमी फायनल खेळवण्यात येईल.

हेही वाचा: राफेल नदालला कोरोना; ट्विटच्या माध्यमातून स्वत: दिली माहिती

मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या अखेरच्या लढतीत भारतीय संघाने जपानला 6-0 असे पराभूत केले होते. त्यामुळे सेमी फायनलमध्ये भारताचे पारडे जड आहे.

आशियाई चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या लढतीत टीम इंडियाने दमदार कामगिरी नोंदवली आहे. गुणतालिकेत 10 गुणांसह भारतीय संघ अव्वल राहिला. भारताच्या पाठोपाठ या यादीत दक्षिण कोरियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 6 गुण कमावले आहेत. जपानने गुणांसह सेमीफायनल पक्की केली असून पाच गुणांसह पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. पाच देशांच्या स्पर्धेत यजमान बांगलादेशची कामगिरी सर्वात सुमार राहिली. त्यांचे स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यांना स्पर्धेतील एकही सामना जिंकता आला नाही.

हेही वाचा: WTC Point Table : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका बरोबरीत; टीम इंडियाचं स्टेटस काय?

अशी राहिली भारतीय संघाची कामगिरी

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाची पहिली लढत दक्षिण कोरिया विरुद्ध झाली. या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीला गोल नोंदवून आघाडी घेतली. पण अखेरच्या टप्प्यात झालेल्या चुकांमुळे दक्षिण कोरियाने सामना 2-2 बरोबरीत सोडवला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने यजमान बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडवत दमदार कमबॅक केले. तिसऱ्या लढतीत भारताने पाकिस्तानला 3-1 असे पराभूत केले. तर अखेरच्या सामन्यात त्यांनी जपानला 6-0 असा पराभवाचा दणका दिला.

भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार

भारतीय हॉकी संघाने यावर्षी दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत अपराजित राहून टीम इंडियाने जेतेपद आपल्याकडेच कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. संघाला सेमीफायनलपर्यंत पोहचवण्यामध्ये सर्वांनीच मोलाचा वाटा उचलला आहे. गतवर्षी भारतीय संघानेची ही ट्रॉफी जिंकली होती. ती आपल्याकडे कामय ठेवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल.

Web Title: Hockey Asian Champions Trophy 2021 Indian Men Hockey Team Will Face Japan In Semifinal Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hockey
go to top