राफेल नदालला कोरोना, ट्विटच्या माध्यमातून स्वत: दिली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rafael Nadal

राफेल नदालला कोरोना; ट्विटच्या माध्यमातून स्वत: दिली माहिती

स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल (Rafael Nadal) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Report Positive ) आला आहे. अबुधाबी येथे रंगलेल्या वर्ल्ड टेनिस स्पर्धेतून कमबॅक करणाऱ्या राफेलला अँडी मरेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेतील कामगिरीवर समाधान व्यक्त करत त्याने आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत कोरोना नियमावलीचे पालन करणार असल्याचे म्हटले होते. पण या स्पर्धेतून मायदेशी परतल्यानंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत. मायदेशी परतल्यानंतर कोरोना प्रॉटोकॉलनुसार त्याची चाचणी घेण्यात आली. यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द राफेल नदालने ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातीलम माहिती दिली आहे. (Rafael Nadal Says He has Tested Positive For Covid 19)

अबु धाबी येथील स्पर्धेतून मायदेशी परतल्यानंतर कोरोनासंदर्भातील PCR चाचणी घेण्यात आली. यावेळी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या घडीला थोडा थकवा जाणवतोय. पण लवकरच बरा होऊन कोर्टवर परतेल, असा विश्वास नदालने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. संपर्कात आलेल्यांनी स्वत:;r कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही नदालने केले आहे.

हेही वाचा: Corona Vaccination नियमावलीवर नदालची 'हेल्दी' प्रतिक्रिया

हेही वाचा: WTC Point Table : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका बरोबरीत; टीम इंडियाचं स्टेटस काय?

पाठिच्या दुखापतीमुळे नदाल जवळपास चार महिने टेनिस कोर्टपासून दूर होता. अबुधाबीतील स्पर्धेतून त्याने पुन्हा एकदा कोर्टवर कमबॅक केले होते. या स्पर्धेत त्याने सेमी फायनलपर्यंत धडक मारली. अबुधाबीतील मुबादला वर्ल्ड टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतील प्रदर्शनिय सामन्यात राफेल नदालला 6-3, 7-5 असे पराभूत करत अँडी मरेनं फायनल गाठली होती. या सामन्यानंतर मरेला पुन्हा सुर गवसल्याचा आनंद नदालने व्यक्त केला होता. याच वेळी त्याला आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत लस घेणं अनिवार्य करण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी आपण स्वत:ला शहाणे समजत नाही. जे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतील त्या गोष्टी करायला तयार आहे, असे उत्तर देत त्याने लस घेण्याला विरोध करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोलाच लगावला होता.

Web Title: Rafael Nadal Says He Has Tested Positive For Covid 19

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..