Women National Championship : यजमान महाराष्ट्राला नमवून हरियाना संघ विजेता

हरियाना संघाने यजमान महाराष्ट्राचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० असा पराभव करून चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत विजेतेपद संपादिले. झारखंड संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.
Women National Championship : यजमान महाराष्ट्राला नमवून हरि
Women National Championship : यजमान महाराष्ट्राला नमवून हरिsakal

पुणे : हरियाना संघाने यजमान महाराष्ट्राचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० असा पराभव करून चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत विजेतेपद संपादिले. झारखंड संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानावर शनिवारी संपलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघातील खेळाडूंनी जोरदार खेळ केला. खेळाच्या २६ व्या मिनिटास हरियानाच्या दीपिकाने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात महाराष्ट्राच्या अक्षता ढेकळेने ५४ व्या मिनिटास गोल करून बरोबरी साधली.

Women National Championship : यजमान महाराष्ट्राला नमवून हरि
IPL 2024 KKR vs SRH : क्लासेनचा क्लास! मात्र राणाने शेवटच्या षटकात केला एसआरएचचा खेळ खल्लास

निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्याने घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये महाराष्ट्राकडून प्रियांका वानखेडे, आकांक्षासिंग आणि ऋतुजा पिसाळ गोल करण्यात अपयशी ठरल्या तर हरियानाच्या नवनीत कौर, उषा आणि सोनिकाने गोल करीत आपल्या संघाला ३-० अशा फरकाने विजय मिळवून दिला.

अंतिम फेरीत हरियाना विरुद्ध महाराष्ट्राच्या खेळाडूंना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. यजमान महाराष्ट्राला सलग दुसऱ्यावर्षा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गतवर्षी मध्य प्रदेश विजेता ठरला होता. तर हरियाना संघाने सहाव्या वेळी अंतिम फेरी गाठताना २०२० नंतर जेतेपद मिळविले आहे. तत्पूर्वी, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत झारखंडने गतविजेता मध्य प्रदेशला २-० असे हरविले. यावेळी विजयी संघाकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू संगीता कुमारीने तिसऱ्याच मिनिटास गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली तर सुप्रिया मुंडूने ५९ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल केला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com