हॉकीपटूंच्या समितीत श्रीजेशची निवड

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) खेळाडूंच्या समितीत भारताचा हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश याची निवड केली आहे. आठ आजी-माजी खेळाडूंचा यात समावेश आहे. महासंघाच्या निर्णयप्रक्रियेत खेळाडूंच्या भूमिकेला वाव मिळावा हा यामागील उद्देश आहे.

श्रीजेशने सांगितले, की ही निवड एक बहुमान आहे. महान खेळाडू मॉरित्झ फ्युएर्स्टी आणि इतर नामवंतांचा या समितीत समावेश आहे. मी नव्या जबाबदारीसाठी उत्सुक आहे. आम्ही खेळाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करू. खेळाडूंसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना मांडू. महासंघाने खेळाडूंना थेट सहभागी करून महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आमचे प्रशिक्षण दल आणि संघाच्या वतीने मी माझ्या सूचना मांडेन. या नव्या जबाबदारीसाठी त्यांची साथ मिळेल याची खात्री आहे.

महासंघाने अनेक ठिकाणी राष्ट्रीय संघांसह बैठकांचे आयोजन केले आहे. या समितीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा क्रीडापटू आयोग आणि इतर संघटनांशी संवाद साधून माहिती आणि संशोधनाची देवाणघेवाण करावी लागेल. आरोग्य, कल्याण, कारकिर्दीची तयारी आणि व्यवस्थापन, डोपिंग-सट्टेबाजी-मॅच-फिक्‍सिंगला विरोध अशा अनुषंगाने समितीला काम करावे लागेल.

Web Title: Hockey selection committee selected of Sreejesh