Hockey WC23: पेनल्टी कॉर्नरवर सुधारणा करणे आवश्यक; भारतासमोर इंग्लंडचे आव्हान

hockey world cup 2023 ind vs eng live india vs england schedule timing hockey news
hockey world cup 2023 ind vs eng live india vs england schedule timing hockey news

Hockey World Cup 2023 Ind vs Eng live : मायदेशात होत असलेल्या हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने स्पेनवर विजय मिळवत शानदार सुरुवात केली आता आजच्या सामन्यात इंग्लंडच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हा सामना जिंकला तर भारताची बाद फेरी जवळपास निश्चित होऊ शकेल.

प्रेक्षकांच्या कमालीच्या उत्साहाचे पाठबळ मिळालेल्या भारतीय हॉकी खेळाडूंनी तेवढाच प्रभावशाली खेळ करून स्पेनला शुक्रवारच्या सामन्यात २-० असे हरविले, पण इंग्लंडचा संघ हा स्पेनपेक्षा ताकदवान आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही लढाई सोपी नसेल. इंग्लंडने त्यांच्या सलामीच्या सामन्यात वेल्सचा ५-० असा धुव्वा उडवून आपली क्षमता कालच सिद्ध केली आहे.(india vs england schedule timing hockey news)

या विश्वकरंडक स्पर्धेसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या २१ हजार प्रेक्षक क्षमतेच्या बिरसा मुंडा स्टेडियमवर कालच्या सामन्यात भारतीयांनी पहिल्या दोन अर्धात चांगलाच आक्रमक खेळ केला. त्याचे रूपांतर गोलात झाले. अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर तर हार्दिक सिंगने मैदानी गोल केले. आक्रमक खेळाबरोबर कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि उपकर्णधार रोहिदास यांनी बचावाच्या अभेद्य खेळाचेही चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे भारताने एकही गोल स्वीकारला नाही. उद्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अशाच भक्कम बचाव खेळाची गरज लागणार आहे. कारण वेल्सविरुद्ध कालच्या सामन्यात इंग्लंडने प्रत्येक अर्धात किमान एक गोल केला होता.

सलामीच्या सामन्यात विजय मिळणे पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वासाला बळकाटी मिळण्याकरिता महत्त्वाचे असते. विजय २-० असला तरी आमचा बचावाचा खेळ अप्रतिम होता. आमच्या खेळाडूंनी चेंडूवर चांगले नियंत्रण मिळवले होते. हेच सातत्य आम्हाला पुढच्या सामन्यातही ठेवायला हवे, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणतात, गोलजाळ्यात जाऊ शकतील असे चेंडू आमच्या बचाव खेळाडूंनी लीलया बाजूला काढले. गोलक्षेत्राच्या समोर आमच्या खेळाडूंचा खेळ होत होता. चेंडूवर पहिल्यापासून नियंत्रण मिळवण्याचा फायदा मिळत गेला.

कालच्या सामन्यात भारताचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि क्रिशन बहाद्दूर पाठक यांना काही काळ दक्ष रहावे लागले होते. त्यांचा कस लागला होता; परंतु त्याच वेळी वेल्सविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा गोलरक्षक ऑलिव्हर पेयनी हा पहिल्या दोन सत्रांत निश्चिंत होता. अखेरच्या सत्रात मात्र त्याला चपळाईपूर्वक खेळ करावा लागला.

पेनल्टी कॉर्नर कमकुवत दुवा

पेनल्टी कॉर्नरवर थेट गोल करणे हा भारताचा कमकुवत दुवा आहे. कालच्या सामन्यात मिळालेल्या पाचही पेनल्टी कॉर्नवर थेट गोल करता आले नाहीत.

कर्णधार हरमनप्रीत कौर हा भारतासाठी हुकमी खेळाडू राहिलेला आहे. गेल्या काही वर्षांत भारताच्या जवळपास प्रत्येक सामन्यात त्याने प्रभाव पाडलेला आहे. कालच्या सामन्यात मात्र तो अपयशी ठरला. पेनल्टी स्ट्रोकवर त्याला गोल करता आला नाही. स्पेनविरुद्धच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नाही; परंतु इंग्लंडविरुद्ध उद्या यात सुधारणा करू, असा विश्वास हरमनप्रीतने व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com