

India Hockey Team
Sakal
Hockey World Cup 2026, India vs England: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सोमवारी (१७ ऑगस्ट) डी पुलमध्ये भारत आणि इंग्लंड संघात सामना झाला. मात्र भारतीय संघाला या सामन्यात ४-२ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या ३२ वर्षात भारताला इंग्लंडला वर्ल्ड कपमध्ये हरवता आले नव्हते. या सामन्यातही भारत हा इतिहास बदलण्यात अपयशी ठरले.
भारताने पहिल्या हाफमध्ये आघाडी घेत वर्चस्व ठेवले होते. पण इंग्लंडने दमदार पुनरागमन करत सामना जिंकला. निकोलस बंडुरॅकने इंग्लंडसाठी दमदार खेळ केला. दरम्यान, भारताने याआधी पहिल्या सामन्यात वेल्सविरुद्ध विजय मिळवल्याने अजूनही भारताला पुढच्या फेरीची आशा आहे. आता १९ ऑगस्टला भारताचा पहिल्या फेरीतील अखेरचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.