

India Hockey Team
Sakal
हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला शनिवारपासून (१५ ऑगस्ट) दणक्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचा सामना नेदरलँड्समधील ॲम्स्टेलवीन येथे वेल्स संघाविरुद्ध पार पडला.
या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व ठेवताना दणदणीत विजयासह स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने वेल्सला ३-१ अशा फरकाने नमवले. त्यामुळे पुल डीमध्ये भारताने आघाडी घेतली आहे.