Hong Kong Open 2025 : आयुषचा जागतिक पदक विजेत्याला धक्का; पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Ayush Shetty Stuns World Medalist : कर्नाटकच्या २० वर्षीय आयुष शेट्टी याने पाचव्या मानांकित कोडाय नाराओका याचे कडवे आव्हान २१-१९, १२-२१, २१-१४ असे तीन गेममध्ये परतवून लावले.
Hong Kong Open 2025

Hong Kong Open 2025

esakal

Updated on

Ayush Shetty defeats world championship silver medalist Kodai Naraoka : भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टी याने हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेमध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. आयुष याने पुरुषांच्या एकेरीमध्ये जागतिक स्पर्धेतील रौप्यपदकविजेत्या कोडाय नाराओका याला पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या २० वर्षीय आयुष शेट्टी याने पाचव्या मानांकित कोडाय नाराओका याचे कडवे आव्हान २१-१९, १२-२१, २१-१४ असे तीन गेममध्ये परतवून लावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com