IPL 2023 Impact Player : आता 11 नाही तर 12 खेळाडू खेळणार सामना; काय आहेत 'इम्पॅक्ट प्लेअर'चे नियम

IPL 2023 Impact Player
IPL 2023 Impact Player esakal

IPL 2023 Impact Player : आयपीएलच्या 16 व्या हंगामात बीसीसीआयने एक नवा नियम आणला आहे. आता आयपीएलच्या सामन्यात कोणताही संघ 11 नाही तर 12 खेळाडू खेळवू शकतो. क्रिकेटच्या पारंपरिक नियमानुसार संघ 11 खेळाडूच खेळवू शकत होते.

मात्र बीसीसीआयने आता इम्पॅक्ट प्लेअर हा नवा नियम आणून संघांना एक अतिरिक्त खेळाडू सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर संघात खेळवण्याची मुभा दिली आहे. मात्र जरी सामन्यात 12 खेळाडू खेळवण्याची मुभा असली तरी प्रत्यक्ष मैदानावर 11 खेळाडू खेळताना दिसतील. यासाठी बीसीसीआयने काही नियम घालून दिले आहेत.

IPL 2023 Impact Player
IPL 2023 CSK Playing 11 : स्टोक्स 16.25 कोटी घेणार अन् फक्त बॅटिंग करणार! CSK ची पहिल्याच सामन्यात कसरत

काय आहेत इम्पॅक्ट प्लेअरचे नियम?

- बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे फ्रेंचायजींना आता सामन्यादरम्यान, इम्पॅक्ट प्लेअर आपल्या प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करता येणार आहे. हा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना वापरता येणार आहे. यासाठी कर्णधाराला संघासोबतच आपल्या चार बदली खेळाडूंची नावे नाणेफेकीनंतर द्यावी लागणार आहेत. यातील एक खेळाडू सामन्यादरम्यान खेळवता येणार आहे. हा इम्पॅक्ट प्लेअर सामन्यावेळी बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंग करू शकतो.

- मात्र जर संघाने प्लेईंग 11 मध्ये 4 विदेशी खेळाडू समाविष्ट केले असतील तर इम्पॅक्ट प्लेअर हा भारतीय खेळाडूच असला पाहिजे. जर संघाने 4 पेक्षा कमी विदेशी खेळाडू संघात घेतले तरच त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विदेशी खेळाडू समाविष्ट करता येईल.

IPL 2023 Impact Player
Virat Kohali : जग गाजवणाऱ्या कोहलीला दहावीला किती मार्क्स होते ठाऊक आहे? गणितात तर...

- बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, संघाने चार बदली खेळाडूंमध्ये समाविष्ट केलेल्या विदेशी खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरता येऊ शकते. जर संघ विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरणार असेल तर कोणत्याही परिस्थितीत मैदानावर 5 वा विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी असणार नाही.

- इम्पॅक्ट प्लेअर हा इनिंगच्या सुरूवातीला किंवा षटक पूर्ण झाल्यानंतर वापरता येईल.

- फलंदाजीचा विचार केला तर इम्पॅक्ट प्लेअर हा विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर झाल्यावर षटकाच्या मधे कधीही घेता येईल.

- जरी इम्पॅक्ट प्लेअरला फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग करता येत असली तरी त्याला संघाचा कर्णधार होता येणार नाही.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com