esakal | ICC Award : स्नेह-शफाली आउट; सोफी-कॉन्वेनं मारली बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

sophie ecclestone and devon conway

ICC Award : स्नेह-शफाली आउट; सोफी-कॉन्वेनं मारली बाजी

sakal_logo
By
सुशांत जाधव

दुबई : इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन हिने भारताची युवा आणि स्फोटक फलंदाज शफाली आणि ऑल राउंडर स्नेह राणाला पिछाडीवर टाकले. सोफीने जून महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकवलाय. (Player of the Month Award June 2021) पुरुष गटात पदार्पणात द्विशतकी कामगिरी करणाऱ्या डेवोन कॉन्वे याने बाजी मारलीये. (ICC Announces Player of the Month Award June 2021 sophie ecclestone and devon conway named players of month)

डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारी फिरकीपटू सोफी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अ‍ॅवार्ड पटकवणारी इंग्लंडची ती दुसरी महिला खेळाडू आहे. यापूर्वी टॅमी ब्यूमॉन्ट हिने फेब्रुवारीमध्ये हा पुरस्कार पटकवला होता. सोफी एक्लेस्टोन हिने भारतीय महिला संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात तिने 8 विकेट घेतल्या होत्या. दोन वनडे सामन्यातही तिने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा: ENG W vs IND W : अटितटीच्या लढतीत भारतीय महिलांनी मारली बाजी

महिला गटातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी शफाली वर्माही शर्यतीत होती. तिने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 96 आणि 63 धावांची खेळी करुन लक्ष्य वेधले होते. दोन वनडे सामन्यातही तिने बहरदार खेळी केली होती. दुसरीकडे स्नेह राणाने कसोटी सामन्यात नाबाद 80 धावांची खेळी करून भारतीय संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले होते. याशिवाय तिने चार विकेट ही घेतल्या होत्या.

हेही वाचा: Wimbledon : जोकोविचचा षटकार! नदाल-फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

पुरुष गटातील पुरस्काराचा मानकरी ठरलेला डेवॉन कॉन्वे हा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने द्विशतकी खेळी केली होती. पुढील दोन सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. यात भारतीय संघाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अर्धशतकाचाही समावेश आहे.

loading image