भारत-पाकमधील गोडव्यासाठी ICC धडपडणार नाही, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK
भारत-पाकमधील गोडव्यासाठी ICC धडपडणार नाही, कारण...

भारत-पाकमधील गोडव्यासाठी ICC धडपडणार नाही, कारण...

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोन्ही देशातील द्विपक्षीय मालिकेसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा रंगली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुन्हा एकदा या मुद्यावर ढवळाढवळ करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुबईमध्ये आयसीसीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ICC चे हंगामी मुख्य कार्यकारी ज्योफ अलर्डिस यांना भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

यावेळी त्यांनी दोन राष्ट्रांमधील निर्णयात कोणताही हस्तक्षेप आयसीसी करणार नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यांतील लढत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच होणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या 8 वर्षात भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. 2012-13 मध्ये दोन्ही देशांत शेवटची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती.

हेही वाचा: सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हॉट फोटोशूट

भविष्यात भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यासाठी आयसीसी भूमिका बजावणार का? असा प्रश्न अलर्डिस यांना विचारण्यात आला होता. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, "दोन्ही देशातील संघ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा आनंद वाटतो. पण द्विपक्षीय मालिकेसंदर्भात आमची कोणतीही भूमिका नसेल. हा प्रश्न दोन्ही देश आणि क्रिकेट बोर्ड यांचा असून यासंदर्भातील अधिकार हे त्यांनाच आहेत. यात आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही.

हेही वाचा: T20 WC : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातही भारत-पाकप्रमाणेच 36 चा आकडा!

मागील 8 वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. 2012-13 मध्ये दोन्ही संघात अखेरची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. पाकिस्तानचा संघ भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास तयार आहे. पण भारत सरकारच्या धोरणामुळे बीसीसीआयने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट संबंध तोडले आहेत. दोन्ही देश आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध भिडताना दिसते. यंदाच्या वर्ल्ड कपपूर्वीही भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले होते.

loading image
go to top