esakal | ICC T20 World Cup: ग्रुप्सची झाली घोषणा; भारत-पाकमध्ये होणार लढत
sakal

बोलून बातमी शोधा

ICC T20 World Cup: ग्रुप्सची झाली घोषणा; भारत-पाकमध्ये होणार लढत

ICC T20 World Cup: ग्रुप्सची झाली घोषणा; भारत-पाकमध्ये होणार लढत

sakal_logo
By
विनायक होगाडे

मस्कट : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज शुक्रवारी ICC च्या पुरुष टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या ग्रुप्सची घोषणा केली आहे. 17 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत ही टूर्नामेंट होणार आहे. ओमान आणि यूएईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. टी 20 वर्ल्ड कप 2021 साठी 12 टीम्स खेळणार आहेत. याआधी क्वालिफायर्स टप्पा असेल, ज्यामध्ये आठ संघ खेळणार आहेत. क्वालिफायर्सच्या दोन गटांना ए आणि बी गटामध्ये भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक गटामध्ये चार टीम्स असणार आहेत.

ए ग्रुपमध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड आणि नामीबिया हे देश आहेत. तर बी गटामध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, पापुना न्यू गिनी आणि ओमान हे देश आहेत. क्वालिफायर्स राऊंडमध्ये ग्रुप ए आणि बी मधील टॉपच्या दोन टीम्सना सुपर-12 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

20 मार्च 2021 च्या टीम रॅकींगच्या आधारावर ग्रुप बनवण्यात आले आहेत. यामध्ये ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, वेस्ट इंडीज हे देश आहेत. तर ग्रुप - 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगानिस्तान हे देश आहेत. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, या टूर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तान या दोन्ही संघात लढत पहायला मिळणार आहे.

loading image