esakal | ICC ODI Ranking:विश्व विजेत्यांना खाली खेचून न्यूझीलंड टॉपला

बोलून बातमी शोधा

Cricket
ICC ODI Ranking:विश्व विजेत्यांना खाली खेचून न्यूझीलंड टॉपला
sakal_logo
By
टीम ई सकाळ

न्यूझीलंडच्या संघाने विश्व चषक विजेत्या इंग्लंडला खाली खेचून वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थान मिळवलंय. 2019-2020 च्या हंगामातील कामगिरीच्या मुल्यांकनावर नवी रँकीग तयारी करण्यात आलीये. यात 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकातील कामगिरीचाही समावेश आहे. मागील एक वर्षांच्या कालावधीत एकमात्र वनडे मालिकेत न्यूझीलंडने बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेत 3-0 असा विजय मिळवला आहे. याचा त्यांना चांगलाच जॅकपॉट लागलाय. दोन स्थानांनी झेप घेत त्यांनी पहिल्या स्थानावर कब्जा केलाय.

न्यूझीलंडने 3 रेटिंग गुण मिळवत 121 गुणांसह आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केलाय. 118 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर असून टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघाला 115-115 गुण असून भारतीय संघ तिसऱ्या तर विश्वविजेता इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. आयसीसीची नव्या रँकिंगचे मुल्यमापन करताना 2020 पासूनच्या सर्व सामन्यातील कामगिरीचा 100 टक्के आणि मागील दोन वर्षांतील सामन्यातील कामगिरीच्या 50 टक्के मुल्यांकनाचा आधार मानले गेले आहे.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

ऑस्ट्रेलियाचा संघ यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. त्यांनी दोन स्थानांनी सुधारणा केलीये. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला असून इंग्लंडला पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर पोहचवले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 107 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा संघाच्या नावे 97 गुण असून तो सहाव्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा नंबर लागतो.

हेही वाचा: ...म्हणून भज्जीनं मानले शाहरुखचे आभार!

ICC मेन्स टी-20 क्रमवारीत इंग्लंडचा संघ अव्वलस्थानी असून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. टी-20 मध्ये न्यूझीलंडच्या संघाने पाचव्या स्थानावर तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय. ऑस्ट्रेलियन संघ टी-20 क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहचला आहे. आयसीसी क्रमवारीत पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. टी-20 क्रमवारीत दक्षिण आफ्रिका सहाव्या क्रमांकावर असून अफगाणिस्तानचा संघ (सातव्या क्रमांकावर) श्रीलंकेवर (आठव्या स्थानावर) भारी पडलाय. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेनंतर कसोटीतील रँकिंग जारी करण्यात येणार आहे.