ICC Rankings : शुभमन गिलला बाबर आझमने दिला मोठा धक्का! सूर्यकुमार अव्वल स्थानावर कायम

ICC Rankings Marathi News
ICC Rankings Marathi News

ICC Rankings : आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत सूर्यकुमार यादवने टी-२० प्रकारातील फलंदाजीतील आपले अव्वल स्थान कायम राखले; परंतु गोलंदाजीत रवी बिश्नोई आणि एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत शुभमन गिलला त्यांचे प्रथम स्थान गमवावे लागले.

आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केल्यामुळे सूर्यकुमारचे अव्वल स्थान अधिक पक्के झाले. भारताची सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू आहे.

ICC Rankings Marathi News
Hardik Pandya : हार्दिकसोबतची जोडी फुटल्यानंतर आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

पुढे होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गिलच्या स्थानावर झाला आणि पाकचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा पहिल्या स्थानावर आला.

टी-२० च्या गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडच्या आदील रशीदने रवी बिश्नोई आणि रशीद खान यांना मागे टाकून अव्वल स्थान मिळवले.

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे अव्वल स्थान कायम राहिले. त्याचप्रमाणे कसोटीतील गोलंदाजीत आर. अश्विन आणि अष्टपैलू खेळाडूंत रवींद्र जडेजा यांचाही पहिला क्रमांक कायम राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com