Indian Women Team Change Strategy After Two Defeats
esakal
यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वकरंडकातील साखळी फेरीमध्ये सलग दोन लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारतीय महिला संघाचा पाय खोलात गेला आहे. उपांत्य फेरीमध्ये पाऊल टाकण्याच्या दृष्टीने आता उर्वरित सर्व लढती महत्त्वाच्या ठरणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आगामी लढतींमध्ये सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायाचा विचार केला जाणार असून, फलंदाजीत परिवर्तन व लवचिकता आणण्यासाठीही पुढाकार घेण्यात येण्याची शक्यता आहे. भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्याकडून रविवारी अशाप्रकारचे संकेत देण्यात आले आहेत.