
Cricket Viral Video : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंना वेगवेगळ्या पद्धतीने विकेट सेलिब्रेशन करताना आपण पाहिलं असेल. वेस्टइंडीज चा डॅरेन ब्राव्हो असो किंवा पाकिस्तानचा शोएब अख्तर विकेट घेतल्यानंतर खास शैलीत सेलिब्रेशन करताना दिसतात, जे क्रिकेट चाहत्यांनाही आवडते. पण क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी असं काही घडतं, ज्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण असतं. असाच काही विचित्र विकेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ ICC ने इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.(icc shared video Serbian Cricketer's Bizarre Celebration Goes Viral)
ICC ने शेअर केला व्हिडिओ आयो मेने-इजेगी विकेट घेतल्यानंतरच्या सेलिब्रेशनचा आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विकेट घेतल्यानंतर गोलंदाज ज्या पद्धतीने विकेट सेलिब्रेट करताना दिसत आहे. क्रिकेटच्या इतिहासात तुम्ही क्वचितच असं सेलिब्रेशन पाहिला असेल.
व्हिडिओ शेअर होताच 3 तासात 2.5 लाख लोकांनी लाइक केले आहे. गोलंदाज विकेट घेतल्यानंतर कोलांटी उडी मारत जिवंत प्रेताप्रमाणे पडून राहा. दोन्ही हात आणि दोन्ही पाय पसरून, जमिनीवर पडून राहतो.