West Indies vs India : स्टार, सोनी नाही तर हक्काच्या चॅनलवर दिसणार मालिका

West Indies vs India Live Telecast Live Streaming When And Where To Watch DD Sports
West Indies vs India Live Telecast Live Streaming When And Where To Watch DD Sportsesakal

नवी दिल्ली : वेस्ट इंडीज दौऱ्यावरील (West Indies vs India) वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून आता निवडसमितीने टी 20 संघाची देखील घोषणा केली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर पाच टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका इंग्लंड दौरा संपल्या संपल्या 22 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आणि सामन्यांचे लाईव्ह टेलिकास्ट (Live Telecast) आणि लाईव्ह स्टीमिंग (Live Streaming) कोठे होणार आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

West Indies vs India Live Telecast Live Streaming When And Where To Watch DD Sports
गांगुली - जय शहांचा कार्यकाळ वाढवा; BCCI ची सर्वोच्च न्यायालयात धाव

वेस्ट इंडीज दौऱ्यावरील वनडे मालिका (WI vs IND ODI Series)

पहिला सामना - 22 जुलै - पोर्ट ऑफ स्पेन - रात्री 7.00 वाजता

दुसरा सामना - 24 जुलै - पोर्ट ऑफ स्पेन - रात्री 7.00 वाजता

तिसरा सामना - 27 जुलै - पोर्ट ऑफ स्पेन रात्री 7.00 वाजता

वेस्ट इंडीज दौऱ्यावर तीन वनडे सामने खेळल्यानंतर लगेचच भारतीय संघ 5 टी 20 सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. या मालिकेच्या आधारे निवडसमिती ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ निडवण्याची शक्यता आहे.

West Indies vs India Live Telecast Live Streaming When And Where To Watch DD Sports
केळी खरेदीचं बील तब्बल 35 लाख? उत्तराखंड क्रिकेट संघटनेत 'भत्ता घोटाळा'

वेस्ट इंडीज दौऱ्यावरील टी 20 मालिका (WI vs IND T20I Series)

पहिला सामना - 29 जुलै - टारोओबा - रात्री 8 वाजता

दुसरा सामना - 1 ऑगस्ट - बासेटेरे - रात्री 8 वाजता

तिसरा सामना - 2 ऑगस्ट - बासेटेरे - रात्री 8 वाजता

चौथा सामना - 6 ऑगस्ट - लॉउड्रेहिल - रात्री 8 वाजता

पाचवा सामना - 9 ऑगस्ट - लॉउड्रेहिल - रात्री 8 वाजता

West Indies vs India Live Telecast Live Streaming When And Where To Watch DD Sports
Athletics : नीरज बरोबरच मराठमोळ्या अविनाशवरही असेल नजर

सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरून होणार

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे वेस्ट इंडीज दौऱ्यावरील सर्व सामन्यांचे प्रक्षेपण हे भारतात डीडी स्पोर्ट्सवरून थेट होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण केबल, डीटीएच आणि डीडी फ्री डीशद्वारे फक्त डीडी स्पोर्ट्सवरूनच होणार आहे. याबाबत प्रसार भारताचे सीईओ मयंक अग्रवाल यांनी सांगितले की, 'भारतात खेळ आणि मनोरंजन जगतात क्रिकेट आघाडीवर आहे यात शंका नाही. आगामी वेस्ट इंडीज दौरा आम्ही डीडी स्पोर्ट्सद्वारे प्रसारित करणार आहोत त्याबद्दल खूष आहोत.'

फॅन कोडवरून Live streaming

वेस्ट इंडीज मधील वनडे आणि टी 20 मालिकांचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे फॅन कोड या अॅपवरून करण्यात येणार आहे. फॅन कोड पहिल्यांदाच आपल्या डिजीटल प्लॅटफॉर्मवरून आंतरराष्ट्रीय मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com