Rohit Rahul T20 Rankings | राहुल, रोहितची क्रमवारीत घसरण; गोलंदाजांच्या यादीतही नाचक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Rahul-Sad

टी२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीचा टीम इंडियाला फटका

राहुल, रोहितची क्रमवारीत घसरण; गोलंदाजांच्या यादीतही नाचक्की

ICC T20 Rankings : टी२० विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने शेजारील देश असलेल्या न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली आणि पहिलंवहिलं टी२० विश्वविजेतेपद मिळवलं. या स्पर्धेत भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी थोडीशी चांगली कामगिरी केली, पण तरीही इतर देशाच्या फलंदाजांच्या तुलनेत ही कामगिरी तोडीची नसल्याने त्यांना क्रमवारीत फटका बसला. मावळता कर्णधार विराट कोहलीला मात्र क्रमवारीत आपले स्थान अढळ ठेवण्यात यश आले.

हेही वाचा: "खेळाडू म्हणजे मशिन नाही"; कर्णधार होताच रोहितचं रोखठोक मत

Team-India-Sad

Team-India-Sad

भारतीय संघाचा नवा टी२० कर्णधार रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे तो क्रमवारीत १ स्थानाच्या घसरणीसह १६व्या स्थानी गेला. टॉप १० मध्ये भारताचे केवळ दोन फलंदाज होते. त्यापैकी लोकेश राहुलला एका स्थानाच्या घसरणीसह सहाव्या स्थानी यावे लागले. विराटने मात्र आपले आठवे स्थान कायम राखले. गोलंदाजी भारतीय संघाने खूपच वाईट कामगिरी केली. त्यामुळे टॉप १० च्या यादीत एक भारतीय गोलंदाजाला स्थान मिळाले नाही. भारताचा सर्वोत्तम स्थानी असलेला जसप्रीत बुमराह क्रमवारीत १५व्या स्थानी आहे. तर भुवनेश्वर कुमार २५व्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतदेखील भारतीय खेळाडूंची अवस्था वाईट असून टॉप २० मध्ये एकाही भारतीयाला स्थान पटकावता आलेले नाही.

हेही वाचा: IND vs NZ : "आता विराट संघात काय करणार?"; रोहितने दिलं उत्तर

दरम्यान, भारतीय संघ आजपासून न्यूझीलंड विरोधात तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर न्यूझीलंडकडूही केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, कायस जेमिसन यांसारख्या खेळाडूंनी मालिकेतून माघार घेतली आहे.

loading image
go to top