२०२४ मधील टी-२० विश्‍वकरंडक अमेरिकेत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC

२०२४ मधील टी-२० विश्‍वकरंडक अमेरिकेत?

सिडनी : ऑलिंपिक या जगातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या क्रीडा महोत्सवात क्रिकेट या खेळाचा समावेश व्हावा यासाठी आयसीसीकडून गेल्या काही वर्षांमध्ये प्रयत्न करण्यात येत आहेत. आयसीसीकडून या अनुषंगाने आणखी एक पाऊल उचलण्यात येणार आहे. २०२८ मधील ऑलिंपिक लॉस एंजिलीस येथे खेळवण्यात येणार असून त्याआधी अमेरिकेत क्रिकेट या खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी २०२४ मधील टी-२० विश्‍वकरंडक अमेरिकेत आयोजित करण्याची योजना आयसीसीकडून आखली जात आहे. जेणेकरून लॉस एंजिलीस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करता येईल.

अमेरिका व वेस्ट इंडीज हे दोन देश संयुक्तरित्या २०२४ मधील टी-२० विश्‍वकरंडकाच्या आयोजनाचा मान संपादन करू शकणार आहेत. २०२४ मधील टी-२० विश्‍वकरंडकाच्या आयोजनाचा मान अमेरिका व वेस्ट इंडीजला मिळाल्यास तब्बल दहा वर्षांनंतर भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन देशांखेरीज इतरत्र आयसीसीची मोठी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा: भारतीय संघाच्या पराभवाचे विश्लेषण; BCCI च्या बैठकीत चर्चा

२०२४ ते २०३१ कालावधीत महत्त्वाच्या स्पर्धा

आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धा २०२४ ते २०३१ या आठ वर्षांच्या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत. ज्या देशांमध्ये क्रिकेटचा प्रसार करण्याची गरज आहे अशा देशांमध्ये महत्त्वाच्या स्पर्धांच्या आयोजन करण्यात यावे यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. यामुळे क्रिकेट हा खेळ हळूवारपणे जगातील कानाकोपऱ्यात पोहचू शकेल. असे आयसीसीला वाटत आहे.

संघ वाढणार

२०२४ आयोजित करण्यात येणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकात १६ ऐवजी २० देशांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. तसेच या स्पर्धेमध्ये ५५ लढतीही होणार आहेत. आखातात पार पडलेल्या टी-२० यंदाच्या विश्‍वकरंडकात १६ देशांचा सहभाग आहे.

loading image
go to top