T-20 World Cup : भुकेलेल्या रोहित शर्माला मराठी पत्रकाराचा डब्बा, ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची आबाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

icc t20 world cup  Captain Rohit Sharma

T-20 World Cup : भुकेलेल्या रोहित शर्माला मराठी पत्रकाराचा डब्बा, ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची आबाळ

सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टी-२० विश्‍वकरंडकातील थरार सुरू आहे, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी स्पर्धा सुरू असतानाही आयसीसी व आयोजक क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्या कामात ढिसाळपणा प्रकर्षाने दिसून येत आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू व्यवस्थापनातील त्रुटींनी; तर पत्रकार आयसीसीच्या नियमांनी त्रस्त व नाराज झाले आहेत.

हेही वाचा: T20 World Cup : टीम इंडिया उपाशी! ऑस्ट्रेलियन जेवणावर टाकला बहिष्कार, वाचा कारण

खेळाडूंना नाराज होण्याचे कारण होते, की एक तर भारतीय संघाला सिडनीतील त्यामानाने सामान्य हॉटेलात ठेवण्यात आले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सराव करायला आलेल्या भारतीय खेळाडूंसाठी प्राथमिक खाण्याची सोय केली गेलेली नव्हती. रात्रीचा सामना खेळण्यासाठी खेळाडू उशिरापर्यंत जागे राहणे पसंत करतात, जेणेकरून मन आणि शरीर दोन्हीही रात्री ११ ते ११.३० पर्यंत निर्णायक क्षणी चांगली कामगिरी करायला साथ द्यायला तयार व्हायला हवेत. साहजिक बरेच खेळाडू रात्री उशिरा झोपून सकाळीसुद्धा उशिराने उठतात.

भारतीय कर्णधार रोहित शर्माला ब्रेकफास्ट न करता सिडनी क्रिकेट मैदानावर यावे लागल्याने सरावानंतर काही काळाने त्याला कडकडून भूक लागली. आत ड्रेसिंग रूममध्ये गेला असता खायला काहीच नव्हते. ‘सकाळ’च्या वार्ताहाराने स्वत:करिता नेलेला जेवणाचा डबा रोहित शर्माला दिला, जो खाऊन शांत होऊन रोहित परत सरावाला गेला.

हेही वाचा: Marcus Stoinis : स्टॉइनिसची दहशत, गोलंदाज हादरले, 10 चेंडूत ठोकल्या 52 धावा! - Video

सरावानंतर धन्यवाद द्यायला रोहित भेटला असताना म्हणाला, ‘संयोजक आमची नीट काळजी घेत नाहीयत. आपण भारतात येणाऱ्या संघाकरिता किती बडदास्त ठेवतो तुम्हाला कल्पना आहे. इतकेच काय, १५ नोव्हेंबरला कप्तानांच्या पत्रकार परिषदेकरिता पर्थहून मेलबर्नला आलो असताना विमानतळावर आम्हाला घ्यायला किंवा पत्रकार परिषद संपल्यावर सोडायची काहीही व्यवस्था आयसीसीने वेळेत केलेली नव्हती. जाताना मी टॅक्सी करून विमानतळावर गेलो, असे नाराज रोहित बोलून गेला.