U19 WC Final : टीम इंडियाचा पंजा; इंग्लंडच्या पदरी ठेंगा!

ICC Under 19 World Cup 2022 India U19 vs England U19, Final
ICC Under 19 World Cup 2022 India U19 vs England U19, Final Sakal

ICC U19 World Cup 2022 England U19 vs India U19 Final Live : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत फायनल जिंकली. आँटिगाच्या मैदानात इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रवी कुमारने सुरुवातीपासून भेदक मारा करत इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले. वैयक्तिक पहिल्या आणि इंग्लंडच्या डावातील दुसऱ्या षटकात रवीनं संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने वैयक्तिक दुसऱ्या षटकात दुसरे यश मिळवून देत इंग्लंडला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलले.

रवी कुमारच्या भेदक माऱ्यानंतर राज बावाने पावा वाजवला. त्याने पाच विकेट्स घेत इंग्लंड संघाचे कंबरडेच मोडले. बावाच्या 5 विकेट्स आणि रवी कुमारने 4 विकेटमुळे इंग्लंडच्या संघाचा डाव 189 धावांत आटोपला. या दोघांशिवाय कौशल तांबेला एक विकेट मिळाली. इंग्लंडने भारतीय संघासमोर 190 धावांचे अल्प आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पण उप कर्णधार राशीदचे संयमी अर्धशतक आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने हे आव्हान 4 विकेट्स राखून पार केले.

  • भारतीय संघाने पाचव्यांदा जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप

  • 176-6 : कौशल तांबेच्या रुपात टीम इंडियाला सहावा धक्का, रेहान अहमदनं घेतला अप्रतिम झेल

  • 164-5 : राज बावाच्या रुपात टीम इंडियाला पाचवा धक्का, पण टीम इंडिया विजयाच्या समीप

  • राज बावा आणि निशांत सिंधू जोडीची पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

  • रा97-4 : जेम्स सेल्सनं भारतीय कर्णधार यश धूलला 17 धावांवर धाडलं माघारी

  • 95-3 : शेख राशीदच्या रुपात भारताला तिसरा धक्का, त्याने 84 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने आश्वासक अर्धशतकी खेळी साकारली

View this profile on Instagram

ICC (@icc) • Instagram photos and videos

उपकर्णधार शेख राशीदची महत्त्वपूर्ण फिफ्टी

  • 49-2 : थॉमसनं टीम इंडियाला दिला दुसरा धक्का, हरनूर सिंग 46 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 23 धावा करुन तंबूत परतला

  • पहिल्या विकेटनंतर टीम इंडियाचा सावध पवित्रा, पहिल्या पावर प्लेमध्ये भारताच्या धावफलकावर 3.3 च्या सरासरीनं 1 बाद 33 धावा सलामीवर हरनूर सिंग आणि उप कर्णधार शेख राशीद मैदानात

  • 0-1 टीम इंडियाची खराब सुरुवात; डावातील दुसऱ्याच चेंडूवर रघुवंशी कॅच आउट, जोशुआनं त्याला खातेही उघडू दिले नाही.

  • 189-10 : जोशूओ बाडनला बाद करत राज बावानं पाच विकेट्स पूर्ण करत इंग्लंडचा खेळ केला खल्लास

  • 185-9 : रवी कुमारनं थॉमसच्या रुपात इंग्लंडला दिला नववा धक्का, त्याची ही चौथी विकेट ठरली

  • 184-8 : जेम्स रिव नर्व्हस नाइंटीचा शिकार, रवी कुमारच्या गोलंदाजीवर कौशल तांबेनं घेतला खतरनाक झेल, 5 धावांनी हुकल जेम्सच शतक

  • 91-7 : कौशल तांबेच्या चेंडूवर Alex Horton 10 धावांवर झेलबाद

  • 61-6 : राज बावाने रेहान अहमदला केले १० धावांवर बाद

  • 47-5 : जॉर्ज बेल 0 धावांवर तंबूत राज बावा भेदक मारा

  • 47-4 : राज बावाने लक्सटनला 4 धावांवर दिनेश बाणाच्या हातून केले झेलबाद

  • 37-3 : राज बावाच्या पहिल्याच षटकात जॉर्ज थॉमस 26 धावांवर बाद

  • 18-2 : दुसऱ्या षटकात रवी कुमारला दुसरं यश, Tom Prest ला त्याने खातेही उघडू दिले नाही

  • 4-1 : इंग्लंडचा सलामीवीर जेकॉब बेथेल पायचित, रवी कुमारनं संघाला मिळवून दिलं पहिलं यश

  • इंग्लंडने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

  • भारतीय संघाने चार वेळा तर इंग्लंडच्या संघाने एकदा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे.

  • फायनलसाठी युवा टीम इंडियाला सुरेश रैनासह अनेक दिग्गज क्रिकेटर्संनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com