jemimah rodrigues recalls inspring conversation with virat kohli
jemimah rodrigues recalls inspring conversation with virat kohli Sakal

भैय्या भेटूया का? स्टार महिला क्रिकेटरनं शेअर केला विराट किस्सा

भारतीय महिला क्रिकेट संघातील युवा बॅटर जेमिमा रोड्रिग्जने अल्पावधीत दमदार यश मिळवले आहे. तिने भारतीय महिला संघासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग खेळल्या आहेत. 21 वनडे आणि 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 394 आणि 1055 धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडमध्ये आहे. पण रॉड्रिग्ज या संघाचा भाग नाही. तिला संघात स्थान मिळालेले नाही.

जेमिमानं सांगितला विराट कोहलीसंदर्भातील खास किस्सा

21 वर्षीय जेमिमाने ‘द रणवीर शो’ मध्ये विराट कोहलीसंदर्भातील खास किस्सा शेअर केला. ती म्हणाली की, स्मृती मानधनासह विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळाली होती. विराट भैय्या आम्हाला बॅटिंग टिप्स हव्या आहेत, भेटू शकाल का? अशा शब्दांत त्याची वेळ घेतली होती, असे तिने सांगितले. न्यूझीलंडमधील एका हॉटेलमध्ये असताना त्याच्याशी बोलणं झालं होते. त्यानंतर आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो, असेही जेमिमाने सांगितले.

jemimah rodrigues recalls inspring conversation with virat kohli
IND vs PAK : कोण भारी? एकच उत्तर; पाक संघाला नेहमीच आपण पुरुन उरतो

ज्यावेळी आम्ही कॅफेमध्ये गेलो त्यावेळी अनुष्का शर्माही होती. आम्ही काही मिनिटे बोलायचो म्हणून भेट घेतली होती. पण तब्बल चार तास आम्ही गप्पा मारल्या. अर्धा तास आम्ही बॅटिंगसंदर्भात बोललो. त्यानंतर मोकळ्या गप्पा मारल्या, असा उल्लेखही तिने केला. कारकिर्दीच्या कठिण परिस्थितीत विराट कोहलीचा मंत्र कामी आला, हे सांगायलाही ती विसरली नाही.

jemimah rodrigues recalls inspring conversation with virat kohli
Record @100 : शंभराव्या कसोटीत Century करणारे फलंदाज

विराट कोहलीसंदर्भात बोलायच तर वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 सामन्यानंतर तो ब्रेकवर गेला होता. मोहाली कसोटीतून तो पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅक करणार आहे. 100 व्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करुन हा सामना अविस्मरणीय करण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com