ICC Women's World Cup 2025
esakal
महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची संधी गमावल्यामुळे अडचणीत आलेल्या भारताचा आज विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना होत आहे. त्यांची फलंदाजीतील ताकद पाहता भारताला सहावा गोलंदाज खेळवण्याचा विचार करावा लागणार आहे. गुरवारी झालेल्या सामन्यात भारताने अडीचशे धावांचे आव्हान दिल्यानंतर आफ्रिकेची २० षटकांत पाच बाद ८० अशी अवस्था केली होती, त्यानंतरही भारताला तीन विकेटने पराभव सहन करावा लागला होता.