IND vs PAK : वर्ल्डकपसाठी भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानने ठेवली आणखी एक अट, जाणून घ्या काय?

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात येणार पण...
India vs Pakistan ODI World Cup 2023
India vs Pakistan ODI World Cup 2023

India vs Pakistan ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात होणार आहे, ज्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी आशिया चषक 2023 पाकिस्तानच्या भूमीवर होणार आहे, मात्र भारताने आपला संघ तिथे पाठवण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानने त्यावर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात येणार नाही, अशी धमकीही दिली. त्यानंतर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एकदिवसीय विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तानचे सामने बांगलादेशमध्ये होऊ शकतात. आता नजम सेठी यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.

India vs Pakistan ODI World Cup 2023
IPL 2023: RCBच्या पराभवाने बदलले प्लेऑफचे समीकरण, विराटच्या संघाकडे आता पात्र होण्यासाठी काय आहे मार्ग?

जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आशियाई क्रिकेट परिषदेने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी प्रस्तावित 'हायब्रीड मॉडेल'ला मान्यता दिलेली नाही, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. 'हायब्रीड मॉडेल'मध्ये भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल तर पाकिस्तान इतर सामने आयोजित करेल.

एका विश्वसनीय सूत्रानुसार, नजम सेठी 8 मे रोजी दुबईला रवाना होणार आहेत, जिथे ते ACC आणि ICC अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत. दुबईच्या भेटीदरम्यान सेठी यांनी पाकिस्तानला पाठिंबा मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू करण्याचीही अपेक्षा आहे. त्यांच्या मते 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत बीसीसीआय आणि आयसीसी लेखी हमी देत ​​नाही तोपर्यंत पाकिस्तान आपले विश्वचषक सामने भारतात खेळणार नाही.

India vs Pakistan ODI World Cup 2023
Mohammed Siraj : आरसीबीची पोरं भांडखोरच! सामन्यात पुन्हा गदारोळ, सिराजच्या कृतीने मैदानात उडाली खळबळ

एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार आहे. विश्वचषकासाठी BCCI ने अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता ही पाकिस्तानच्या सामन्यांसाठी मैदाने म्हणून निवडली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. जिथे एक लाख प्रेक्षक बसून सामना पाहू शकतात.

India vs Pakistan ODI World Cup 2023
CSK vs MI : मुंबई इंडियन्सला 'या' खेळाडूची भासली उणीव! पराभवानंतर कर्णधार रोहितने याला धरले जबाबदार

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक वेळी भारताचा संघ विजयी झाला आहे. भारताने 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. त्याचवेळी पाकिस्तानी संघाने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली 1992 चा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही. एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना झाला होता. जिथे भारताने 89 धावांनी विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com